स्वरा संग्रामे हिचे मंथन राज्यस्तरीय गुणवत्ता परीक्षेत यश


सावळज /दि२२ 
मंथन प्रज्ञाशोध परीक्षा २०२० ची राज्यगुणवत्ता यादी मंथनच्या वेबसाईटवरुन प्रसिद्ध झाली. राज्यातील  विविध केंद्रावरुन घेण्यात आली होती. सावळज शाळा नं.२ ने या वर्षी सुध्दा गुणवत्तेची परंपरा कायम ठेवलेली आहे.
  तासगाव तालुक्यातील सावळज शाळा नं.२ जिल्हा परिषद शाळेची इयत्ता दुसरीत शिकणारी कुमारी स्वरा सुधाकर संग्रामे हिने १५० पैकी १४० गुण मिळवून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये ६ वे स्थान प्राप्त केले आहे.

तिने तिच्या यशाचे श्रेय वर्गशिक्षिका वासंती पाटील मॅडम, हसबे मॅडम,आई  ललिता ,वडील  सुधाकर व याआधी शिकविणार्‍या शिक्षकांना दिले आहे. मुख्याध्यापिका  बबुताई भोसले,केंद्रप्रमुख  पांडुरंग शिंदे , प्रकाश कांबळे  शिक्षण विस्तार अधिकारी यांनी मुलीचे अभिनंदन केले.  विविध अधिकारी वर्गाकडून शिक्षकांकडून , मित्रमैत्रीणींकडून व सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule