सांगली शहरात कोरोना ....विजयनगर येथील बँक कर्मचाऱ्यांस लागण .....सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची माहिती
साांगली/दि.19,एप्रिल 2020
सांगली शहरातील विजयनगर येथे राहणारा 47 वर्षाचा युवकास कोरोणा ची लागण
झाली असुन हा रूग्ण एका सहकारी बँकेत नोकरी करत असल्याचे समजते या इसमास निमोनिया चा त्रास जाणवू लागल्याने १७ एप्रिल रोजी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते , दरम्यान त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे प्रशासनाने आपल्या हालचाली गतिमान करत सदरचा रुग्ण ज्या विजयनगर भागात राहतो तो संपूर्ण भाग सिल केला आहे. इस्लामपूर येथील एकाच कुटुंबाशी संबंधित २६ रुग्ण कोरोना बाधित होते. त्यापैकी २५ रुग्णांची अंतिम चाचणीही निगेटिव्ह आली असल्याने प्रशासनानेही सुटकेचा निःश्वास सोडला होता , व शहरात शिथिल वातावरण होईल अशी आशा असतानाच सांगली शहरांमध्ये नवा कोरोना बाधित सापडल्याने सांगली शहर वाशिय तसेच जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे, संबंधित व्यक्तीच्या घरातील व इतर संपर्कात आलेल्यांंची प्रशासनाकडून योग्य तपासणी सुरू आहे. त्यामुळे सांगली शहर व परिसर सील करून प्रशासनाने सर्व हालचाली गतिमान केल्या आहेत. पण संबंधित कोरोणा बाधित रुग्ण बँक कर्मचारी असल्याने अनेक ओळखीच्या -अनोळखी कस्टमर संपर्कात आल्या ची भीती व्यक्त केली जात आहे.
.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा