गटप्रवर्तक महिलांनाही प्रोत्साहन भत्ता द्या - कॉम्रेड हनुमंत कोळी*

 माडग्याळ प्रतिनिधी:
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा वर्कर आणि गटप्रवर्तक महिला जीवाची जोखीम पत्करून ऊन,वार तहानभूक विसरून काम करत आहेत. त्यांच्या कामाचे महत्त्व आता शासन प्रशासनाला पटले आहे मात्र त्यांच्या तुटपुंज्या मानधनाकडे लक्ष कधी जाणार गटप्रवर्तक महिला आशांची दुर्दशा कधी थांबणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोना ने डोके वर काढल्यापासून आरोग्य यंत्रणा प्रशासनाची धावपळ सुरू आहे जिल्ह्यात २० मार्चपासून आशा वर्कर घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. कोरोनाविरोधातील युद्धात हे सैन्यच सुरुवातीपासून आघाडीवरराहून काम करत आहेत विदेशातून अन्य राज्यातून अन्य जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तिची माहिती घेणे व ती तात्काळ आरोग्य यंत्रणेला कळवणे त्यांना होम क्कारंटाईन करणे रोज घरी भेट देऊन माहिती घेणे स्थानिक लोकापैकी कोण आजारी असतील तर त्यांची माहिती आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहोचवण्याचे काम आशा वर्कर करत आहेत. त्यामध्ये गटप्रवर्तकांचे नियोजन रिर्पोटिग अतिशय महत्त्वाचे ठरत आहे. 
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार आशा वर्करना १ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मिळत आहे गटप्रवर्तकांना या प्रोत्साहन भत्तातून वगळले आहे मात्र त्यामागे काहीच कारण दिसून येत नाही शासन विसरले असावे एवढेच कारण दिसत आहे गटप्रवर्तक महिलांनाही प्रोत्साहन भत्ता मिळणे आवश्यक आहे 
*दोन हजार रू मानधनाची नुसती घोषणाच* 
आशा वर्कर यांना तेलंगणा केरळमध्ये ७ हजार ५०० रुपये मानधन मिळते महाराष्ट्र राज्य शासनाकडून काहीच मानधन मिळत नाही केंद्र शासनाकडून २ हजार रुपये मानधन मिळते राज्य शासनाने २ हजार रुपये मानधनाची घोषणा केली आहे मात्र ती केवळ घोषणाच ठरली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule