व्हसपेट ता. जत येथे ग्रामपंचायत कडून सँनिटायझर आणि मास्क वाटप
प्रतिनिधी माडग्याळ/21
कोरोणा वायरस ने घातलेल्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील व्हसपेट ता. जत येथे ग्रामपंचायत कडून सँनिटायझर आणि मास्क वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत व्हसपेटचे सरपंच रामचंद्र साळुंखे , ग्रामसेवक हुसेन पाटील ,सह गावचे सदस्य यांनी मिळुन ग्रामपंचायत समोर सोशल डिस्टंसिग पाळत काही नागरिकांना वाटप केले व नंतर आशा वर्कर यांच्या कडे मास्क व सँनिटायझर च्या घरपोच वाटपाची जबाबदारी देऊन त्यांच्या मार्फत या वस्तू गावातील प्रत्येक कुठुंबापर्यंत पोहच केले. तत्पूर्वी सरपंच राम साळुंखे यांनी गावातील नागरिकांना आवाहन केले कि, अत्यावश्यक कामा व्यतिरिक्त घराबाहेर पडु नये, व बाहेर जात असताना, मास्क नियमित मास्कचा वापर करण्यास सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा