ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या खर्चाची माहिती वेळेत सादर न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल.तहसीलदार सचिन पाटील



जत /
जत तालुक्यातील दि.१५ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत झालेल्या खर्चाची माहिती निवडणूक निकाल  लागल्यापासून एक महिन्याच्या आत म्हणजे बुधवार दि.१७ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंतच  उमेदवारानी निवडणूक विभागाकडे सादर करावी वेळेत निवडणूक खर्चाची माहिती सादर  न केल्यास सबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहीती निवडणूक अधिकारी तथा  जतचे तहसिलदार श्री. सचिन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे. 

   त्यानी पत्रकात म्हटले आहे की,जत तालुक्यात दि.१५/१/२०२१ रोजी ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत .त्या ग्रामपंचायतीमध्ये ज्यानी उमेदवार म्हणून सहभाग घेतलेले आहेत.त्या सर्व उमेदवारांनी दि.१८ जानेवारी २०२१ निवडणूक निकाल झालेपासून एक महिन्याच्या आत म्हणजेच बुधवार दि.१७ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंतच निवडणूक खर्चाची माहिती  देण्याची आहे.  तसेच शासनाचे ट्रू व्होटर अॅप वर निवडणूक खर्चाची माहिती नमुना नंबर १/२/३/४मध्ये भरून त्याची प्रत आरओ/एआरओ यांच्या मार्फत तपासणी अंती आरओ यांच्या मार्फत तपासणी पथकाकडे सादर करावी.

    जे उमेदवार आपणास निवडणुक प्रक्रीयेत आलेल्या खर्चाची माहिती सादर करणार नाहीत त्यांच्या विरुद्ध कडक कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे उमेदवारानी वेळीच खर्चाची माहिती सादर करावी  अन्यथा वेळेत निवडणूक खर्चाची माहिती दिली नाही म्हणून व्यक्तीशा उमेदवाराला जबाबदार धरण्यात येऊन त्याच्यावर कडक  कारवाई करण्यात येईल अशी  माहीती  निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार श्री. सचिन पाटील यांनी प्रसिद्ध पत्रकाव्दारे दिली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule