जत शहर पूर्ण सात दिवस लॉकडाउन करावे यासाठी वंचित बहुजन आघाडी ता.जत कडुन निवेदन
जत
जत तालुक्यातील बिळुर येथे आठवडाभरापुर्वी एका इस्त्री व्यवसायिकाला कोरोणाची लागण झाली होती. सदर व्यक्ती कडुन बिळुर गावातील अनेक लोकांना या संसर्गजन्य रोगाची लागण झाली .ता.03जुलै 2020 पर्यंत हा आकडा 46 पर्यंत वाढतच गेला. अशाप्रकारे बिळुर हे गाव कोरोणा विषाणूचे हॉटस्पॉट बनले.बिळुर व परिसरातील लोकांचा वावर खुप मोठ्या प्रमाणात जत शहरात असतो, हि बाब लक्षात घेऊन,प्रशासकीय यंत्रणेने बिळुर व परिसरातील नागरिकांच्या मुक्त संचार वर निर्बंध आणले पाहिजे तसेच पुर्ण सात दिवसांसाठी संपुर्ण जत शहर लॉकडाउन करण्यात यावे यासाठी वंचित बहुजन आघाडी जत ता. वतीने निवेदन देण्यात आले.
या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, सदरचे कोरोणा हॉटस्पॉट बनलेले बिळुर मधील लोकांचा वावर जत शहरात जास्त होता,
तसेच या गावातील एक किराणा दुकानदार, दोन आरोग्य सेविका, व एक क्रुषी सेवा केंद्र चालक , व एक शिंदि विक्रेता या सर्व व्यक्तिंसोबत गावतील अनेकांचा संपर्क आला होता, या सदर व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या सुमारे 150 नागरिकांना संस्था क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तसेच मेंढेगिरी व तिल्याळ या गावातील 2 व्यक्ती पॉझिटीव आल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे, जत शहरासह पुर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जत शहराच्या हितासाठी संपूर्ण जत शहर लॉकडाउन करावे असी विनंती निवेदनाद्वारे दिली.
यावेळी ता.अध्यक्ष अमोल साबळे,श्रीकांत सोनवणे,संजय (बंडु) कांबळे,मोसिन नदाफ,प्रशांत झेंडे ,धिरज सनदी, संदिप साळे,शशिकांत शिसवारे,हरीष वाघमारे, जि.अध्यक्ष भारिप गिरीश वाघमारे,जुबेर मंगळवेढे,सुरेश कोळी , विशाल सनदि,स्वप्निल ऐवळे,आदींनी निवेदनावर स्वाक्षरी केल्या आहेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा