उमदी पोलीस ठाणे हद्दीतील उमदी- संख नाका बंदी करून दुचाकी वाहान व मास्क न वापरणे तसेच धूम्रपान कारवाई ....वाहन कायद्याप्रमाने 94 केसेस करून 18,800/-रू दंड , मास्क न वापरणे 18 खटले,धूम्रपान करणारे 12 केसेस 2,400/- दंड



संख प्रतिनिधी -राजेभक्षर जमादार 

जत तालूका संख येथे उमदी पोलीसाकडून  दि. 03 रोजी मा. पोलीस अधीक्षक सांगली यांनी दिले आदेशाप्रमाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी जत यांचे मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाणे हद्दीत उमदी व संख या गावी नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली त्यामध्ये विना मास्क , डबल सीट, तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे इसमाचेवर कारवाई केली आहे. 

जत तालूका उमदी ठाणेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मार्गदर्शनखाली उमदी व संख येथे कारवाईमध्ये मोटर वाहन कायद्याप्रमाणे 94  केसेस करून 18800/- रु दंड  केले आहेत, मास्क न वापरणाऱ्या 11 खटले दाखल केले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे  लोकांनवर 12 केसेस करून 2,400/- रु दंड वसूल केला आहे.तसेच दि.03 जुलै  रोजी उमदी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना  बोर्गी बुद्रूक गावी रमजान बंदगीसाब शेख हा त्याचे शेतातील घराचे पाठिमागे मोकळ्या जागेत देशी दारूची विक्री करीत आहे. असे पोलीस नाईक नितीन पलूसकर यांना  गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यानंतर सदरची बातमी सपोनि कोळेकर यांना कळवून सपोनि कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बातमी खात्री करून छापा पोलीस नाईक नितीन  पलूसकर ,पोलीस नाईक श्रीशैल वळसंग यांनी बातमीच्या ठिकाणी जाऊन छापा टाकून  रमजान बंदगीसाब शेख यास व त्याचे कब्जात असले दोन्ही खाकी कलरचे बॉक्स तपासून पाहता त्यामध्ये देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या दोन्ही बॉक्समध्ये एकूण 96 बाटल्या मिळून आल्या प्रति बाटली 50 रु किंमतीने एकूण 4800/-  रुपयांचा दारू माल मिळून आला आहे त्याबाबत पोलीस नाईक श्रीशैल वळसंग यांनी उमदी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस नाईक नितीन पलूसकर हे करीत आहे तसेच उमदी गावी ग्रामपंचयत कार्यलयशेजारी बोळात वर्तमान पत्रातून प्रसिद्ध होणारा कल्याण नावाचा मटका जुगार खेळ घेत असताना महादेव तिपन्ना कांबळे वय 35 वर्षे रा उमदी ता जत जि सांगली यास सहा पोलीस उपनिरीक्षक श्री कोळी, पोलीस शिपाई संभाजी कारंडे असे त्यास पकडून त्याचे कब्जातील मटक्याची चिठी व एक पेन व रोख रक्कम 520/- रु असा मुद्देमाल मिळून आला आहे. त्यानंतर त्यास पोलीस स्टेशन ला आणून गुन्हा दाखल करून पुढील तपास  सहा पोलीस उपनिरीक्षक श्री भगवान कोळी हे करीत आहे. यापुढे ही अश्या प्रकारची कारवाई होत राहणार असे सपोनि श्री कोळेकर सो यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule