अमोल साबळे यांनी दिलेल्या जत शहर बंदच्या हाकेला शहरवासीयांनी दिली ओ...
प्रतिनिधी जत
कोरोणा विषाणू ने जत तालुक्यातील बिळुर गावासह परीसरात थैमान घातलेले असताना, तालुक्यात व जत शहरातील नागरिक भितीच्या छत्रछायेखाली वावरत असल्याची परीस्थिती आहे. बिळुर सह, मेंढेगिरी, तिल्याळ सारख्या ग्रामीण भागात कोरोणा संक्रमित रुग्णांची वाढती संख्या पाहता वाढता धोका लक्षात घेऊन , वंचित बहुजन आघाडी जत तालुका चे ता. अध्यक्ष अमोल साबळे व पदाधिकारी यांनी केलेल्या निवेदनास प्रतिसाद देत, जत शहरवासीयांनी व व्यापारी वर्गाने 100टक्के शहर लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.
जत शहरात कोरोणाची साखळी होऊ नये यासाठी दक्षता म्हणून लॉकडाउन करावे असे निवेदन अमोल साबळे यांनी जत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार,पोलिस प्रशासन व व्यापारी वर्ग यांना निवेदन देऊन विनंती केली होती.
या निर्णयाचा विचार करुन व्यापारी बंधुनी सहा जूलै पासुन अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण शहर लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाचे अमोल साबळे यांनी कौतुक केले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा