*वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अमोल साबळे यांनी पालकमंत्री व जिल्हाधकारी यांचे मानले आभार

      अमोल साबळे , वंचित बहुजन आघाडी जत

प्रतिनिधी जत.
सध्या देशात व राज्यात कोरोणा हा विषय अतिशय गंभीर आणि चिंतेची बाब बनली आहे, सांगली जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी या विषाणुं चा फैलाव अतिवेगाने होत असल्याची परिस्थिती आहे, जत तालुक्यातील सुद्धा कोरोणा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने  प्रशासन आणि सामान्य नागरिक हे भीतीच्या छत्र छायेखाली आहेत.याला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव  पर्याय होता आणि आहे, हि दिवसेदिवस वाढत जाणाऱ्या कोरोणा संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अमोल साबळे यांनी जत तहसीलदार व प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन ही मागणी केली होती,पण सांगली जिल्ह्यातील च वाढत जाणारी रुग्ण संख्या लक्षात घेत मा. पालकमंत्री यांनी जिल्हाधिकार्यालयात मिठींग घेऊन आठ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय अभिनंदनीय आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने हा मोलाचा निर्णय घेऊन वंचित आघाडी ने दिलेल्या निवेदनाचा विचार करून लॉकडाऊन केल्याने वंचित बहुजन आघाडी जत कडून ,दै.जनमत शी संवाद साधत अमोल साबळे यांनी मा. पालकमंत्री यांचे आभार मानले.
यावेळी साबळे यांनी जत सह परीसरातील नागरिकांना, घरी राहुन आपली काळजी घ्या , प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule