कोसारी येथे आमदार विक्रम (दादा)सावंत यांच्या हस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन :ग्रामपंचायत कोसारी

कोसारी/ प्रतिनिधी .दिनांक: 06/07/2020.
      जत पासुन अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या कोसारी ता जत येथे विविध विकास कामाचे उद्घाटन आमदार विक्रम (दादा)सावंत यांच्या उपस्थितीत अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. 
          यामध्ये 14वा वित्त आयोगातुन अनेक विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये ग्रामपंचायत कोसारी आणि जत तालुक्याचे विद्यमान आमदार विक्रम (दादा)सावंत यांचे  महत्वाचे श्रेय आहे. कोसारी गावच्या विकासात सातत्याने भर घालणार असे त्यांनी सांगितले. युवकांनी माझ्यापर्यंत कोणतेही प्रश्न मांडा मी त्यावर मनापासून प्रयत्न करणार असे ते म्हणाले.
         कोसारी ग्रामपंचायतीच्या विकासकामामध्ये 14वा वित्त आयोगातुन कोसारी गावामध्ये 1.रोहिदास नगर बंदिस्त गटार , 2.गावठान अंतर्गत पेव्हींग ब्लाॅक बसवणे, 3.गावठान बंदिस्त गटार, 4.इंदिरानगर रस्ता काँक्रीट करणे, 5.कोसारी गुळवंची रस्ता लगतचा महारनुरवाडी रस्ता मुरमीकरण करणे.इत्यादी विकास कामाचे उद्घाटन समारंभ आमदार विक्रम सावंत यांच्या उपस्थितीत पार पडला. 
              या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती आ.विक्रम (दादा)सावंत साहेब,श्री. आप्पारामा बिरारार,पंचायत समिती सदस्य सौ. अर्चना नाथा पाटील,मा.सभापती पंचायत समिती सदस्य बाबासाहेब कोडग,मा.जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास भोसले ,सुरेश मुटेकर,रवी पाटील,गुंडा माने,किसन सांगोलकर,किसन टेगंले,मधुकर  भोसले, कोसारी गावचे विद्यमान सरपंच तानाजी बिसले,उपसरपंच बाळासाहेब पवार,ग्रामविकास अधिकारी मा.संजय भाते,सर्व ग्रामपंचायत सदस्य,क्लारक कर्मचारी,ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule