व्हसपेट येथील बुद्ध विहार पुन्हा एकदा नव्याने सुरू
जत, दि.05/2020
गुरुपौर्णिमेचा दिवसी व्हसपेट ता.जत येथील बंद असलेले बुद्ध विहार पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्यात आले. व त्यानिमित्ताने बोधि व्रुक्ष (पिपळ)व्रक्षाचे रोपन करण्यात आले.
गेली 25 वर्ष बुध्दमंदिर असुनही ते समाजासाठी वापरात न्हवते आणि ज्यावेळेस ते ताब्यात मिळाले या वास्तुची खुप दयणीय अवस्था झालेली होती. आपल्या वास्तुची झालेली हि अवस्था पाहून पुणे ,मुंबई हून आलेले सूरेश कीर्तीकर ,गणेश कांबळे, मुकेश हुवाळे हे संपूर्ण भारत लॉकडाउन पडल्याने गावी येउन 15 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपवुन या वास्तु दूरुस्तीचा संकल्प हाती घेतला व समाजातील मंडळी ,सरपंच ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करून , हे समाज मंदिर दुरुस्तीचे काम पुर्णत्वास नेले, या कार्यात समाजातील सर्व लोक, शिक्षक मंडळी अधिकारी वर्ग यांनी सढळ हातानी धम्मदान दिले व शेवटी ही वास्तु सजीव बनवली.
त्यानिमित्ताने गुरुपौर्णिमेचा दिवस साधुन हे विचारपीठ, बौद्धमंदिर सर्वांसाठी पून्हा एकदा उघडण्यात आले. सध्या चाललेल्या या भयानक कोरोणा वायरस च्या पार्श्वभूमीवर सामाजिक जागरूकता लक्षात घेत , सोशल डिस्टंसिग, मास्क या सर्व बाबी पाळत काही मोजक्या प्रतिष्ठितांसह हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पार पडला यावेळी या कार्यक्रमास उपस्थित , संयोजक सुरेश किर्तीकर सर , क्रुषी अधिकारी लहु कांबळे साहेब, गावचे सरपंच रामभाऊ साळुंखे,ग्राम सेवक हुसेन पटेल आण्णा ,आर पी आय जत ता.अध्यक्ष श्रीकांत हुवाळे, शिवसेना ता.प्रमुख अंकुश हुवाळे, शिक्षक भारती जत ता. अध्यक्ष दिगंबर सावंत सर , प्रल्हाद हुवाळे सर(सचिव पुणे विभाग , मागासवर्गीय शिक्षक संघटना) सुभाष हुवाळे सर ,पांडुरंग केंगार, पत्रकार केराप्पा हुवाळे सुरेश सनदी अशोक हुवाळे, इत्यादी सह अनेक जण उपस्थित होते.
यावेळी क्रुषी अधिकारी लहु कांबळे साहेब, सुरेश किर्तीकर सर ,दिगंबर सावंत सर प्रमोद कांबळे, सचिन झेंड सह काही बालचमुंनी आपले मनोगत व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा