कोसारी येथे आमदार,गोपिचंद पडळकरांच्या प्रतिमेचा दुग्धाअभिषेक सोहळा संपन्न

 .
 कोसारी /प्रतिनिधी .दिनांक :01/07/2020.
शरद पवारांवरील  वादग्रस्त  विधानामुळे चर्चेत असलेले भाजप आमदार गोपिचंद पडळकर जतला आले असताना कोसारी येथील ग्रामीण विकास संस्थेस भेट दिली होती.यावेळी कोसारी येथील त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला असुन त्यांना पाठींबाही दर्शवला आहे. यामध्ये भाजप युवा नेते आणि कोसारी गावचे  माजी विद्यमान  उपसरपंच मधुकर भोसले आणि संस्थेचे अध्यक्ष मा .श्री . विवेक टेगंले यांच्याकडुन ही मोठा सत्कार करण्यात आला. अगदी मतदानाचा हक्क नसताना सुद्धा आमदार गोपिचंद पडळकर यांचे कट्टर समर्थन करणारे सिद्धु महारनुर आणि विशाल महारनुर यांचा सत्कार आ.गोपिचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला. 
      या सर्व उत्साहाने जत पासुन अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या कोसारी गावामध्ये आमदार गोपिचंद पडळकर यांच्या समर्थकांनी कोसारी ग्रामपंचायत समोर आ.पडळकर यांच्या प्रतिमेला दुधाने अभिषेक घालुन आजपर्यंतचा सर्व कलंक धुवुन काढुन त्यांना पाठीबांही दर्शवला.
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर जो प्रश्न उपस्थित केला होता आजतागायत आरक्षण न मिळाल्याने आ.पडळकर यासारख्या मनाचा उद्रेक होणे हे स्वाभाविक आहे. कारण आरक्षण हा आमचा भावनिक मुद्दा आहे. त्यामुळे आ.पडळकर यांना धनगर समाजाचा पाठींबा आहे त्याचा समर्थनार्थ म्हणुन त्यांच्या प्रतिमेचा दुग्धाअभिषेक सोहळा संपन्न करण्यात आला. 
   यावेळी युवा नेते दादासाहेब पाटील,पांडा सोलंकर,बंडा सोलंकर,विकास महारनुर यांच्या उपस्थितीत कोसारी येथील विशाल महारनुर,महादेव महारनुर,नितीन टेंगले,सिद्धु महारनुर,अंकुश गोयकर,दत्ता टेगंले,भोजलिंग महारनुर,प्रविण महारनुर,किरण महारनुर यांच्या संकल्पनेतुन  हा सोहळा संपन्न झाला. 
     70वर्षे सत्तेत असुनही एसटी आरक्षणाचा प्रश्न न सोडवता 
फोडा व राज्य करा त्यावर आपल राजकिय हित जोपासनारा शरद पवार म्हणजेच कोरोना यावर गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी कोसारी येथे आ.पडळकर यांच्या प्रतिमेला दुधाने अभिषेक घालुन आजपर्यंतचा सर्व कलंक धुवुन काढुन गो कोरोना गो !एकच छंद गोपीचंद हा नारा देत आमदार पडळकर यानां पाठींबा दर्शवला. आ.पडळकर हे एक सॅनेटायझर च आहेत असही सांगितलं जातंय .


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule