व्हसपेट ता.जत येथे अपघातात एकाचा जागीच म्रुत्यु


प्रतिनिधी माडग्याळ 
व्हसपेट ता.जत येथिल उतारावर  अपघात होऊन  एकाचा जागीच म्रुत्यु होण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदरील मयत इसम हा गारळे वाडी ता.जत चा  असुन त्याचे नाव  म्हाळाप्पा लक्ष्मण गारळे (वय 45) असे आहे, मिळालेल्या माहिती नुसार हा इसम वळसंग येथील नातेवाईकांच्या घरुन येत असताना पहाटे पाच सहा च्या सुमारास व्हसपेट येथील उताराला मोटार सायकल चा वेग सावरता न आल्याने गाडीचा ताबा सुटुन डांबरी सोडुन खाली काही अंतरावर दगडात आदळल्याने या व्यक्ती चा म्रुत्यु झाल्याचे दिसते ,  घटनेची माहिती मिळतात  जत पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी हजर झाले. पुढील तपास जत पोलीस करत आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule