भाजप युवा मोर्चा जत तालुकाध्यक्षपदी बसवराज पाटील
जत/प्रतिनिधी:
भारतीय जनता पार्टी जत तालुका कार्यकारिणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत व माजी आमदार विलासराव जगताप यांच्या मार्गदर्शनाने जाहीर करण्यात आली. भाजप युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्ष पदी एकुंडीचे सरपंच बसवराज पाटील यांची निवड करण्यात आली.
पक्षाची पुढील वाटचाल व राजकीय समीकरणे याचा विचार करून अनेक सक्षम व्यक्तींना या कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले आहे.संघटनेत अनेक वर्ष प्रभावीपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला हे पद दिले गेल्याने तालुक्यातील युवकांत अतिशय उत्साहाचे वातावरण आहे.
बसवराज पाटील म्हणाले, तालुक्यातील युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण काम करू. तालुक्यातील गावागावांत युवा मोर्चाच्या शाखा उघडणार असून या माध्यमातून जनतेचे विविध प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न राहिल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा