जत मधील सर्व सी सी टि व्ही कॅमेरे सुरू करा...संजय कांबळे RPI (Athavale)
जत/ प्रतिनिधी.
जत नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व भा.ज.प.चे युवा नेते उमेश सावंत व जत व्यापारी बांधवानी पुढाकार घेऊन शहरात चौकाचौकात बसविण्यात आलेले सि.सि.टि.व्ही. कॅमेरे सद्या बंद अवस्थेत असून चार दिवसावर आलेल्या दिपावली सनापुर्वी हे सर्व सि.सि.टी.व्ही. कॅमेरे प्रशासनाने पूर्ववत सुरू करण्यासाठी सबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष आयु. संजयरावजी कांबळे यांनी केली आहे.
.याबाबत सविस्तर माहिती अशी की जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत वारंवार होणारे चोरीचे प्रकार तसेच वाहतूक कोंडी यावर नियंत्रण रहावे यासाठी जत नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष युवकनेते श्री. उमेश सावंत यांनी जत शहरातील सर्व व्यापारी तसेच दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून निधी जमा करून जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत तसेच चौकाचौकात २२ सि.सि.टि.व्ही. यंत्रणा बसवून कार्यान्वित केली होती.
सुरुवातीला ही यंत्रणा चांगल्या प्रकारे सुरू होती. ज्या चौकात ही यंत्रणा बसविण्यात आली होती. तेथील व्यापारी बंधू या यंत्रणेसाठी आपले दुकानातून विद्धूत पुरवठा करत होते. त्यामुळे ही यंत्रणा चांगल्या प्रकारे सुरळीतपणे चालू होती. व या यंत्रणेमुळे शहरातील व प्रमुख बाजारपेठेतील वाहतूककोंडी व वारंवार होणारे चोरीचे प्रकार यावर नियंत्रण बसले होते.
परंतु ही यंत्रणा ज्या ठिकाणाहून कार्यान्वित होत होती. त्या विद्धूत खांबाला अवजड वाहनाने जोराने धडक दिल्याने ही संपूर्ण २२ सि.सि.टि.व्ही. यंत्रणा सद्या पूर्णपणे बंद अवस्थेत आहे.
ही बंद पडलेली यंत्रणा पूर्ववत सुरू करण्यात यावी यासाठी जत व्यापारी असोसिएशन, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्षाची नेतेमंडळी व कार्यकर्ते यांनी जत नगरपरिषद, तहसिलदार व पोलीस प्रशासन यांच्याकडे वारंवार मागणी करूनही त्यानी याकडे दुर्लक्ष केले आहे.
सध्या चार दिवसावर दिपावलीचा सन आला आहे. या सनाच्या पार्श्वभूमीवर जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. तसेच दिवाळी खरेदीसाठी आलेले जत शहरवासिय हे आपली वाहने रस्त्यावरच लावत असल्याने तसेच अवजड वाहनेही रस्त्यावर पार्क होत असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. याचाच फायदा घेऊन चोरटे लोक चोरी करत असल्याने यावर नियंत्रण ठेवणे कठीण जात आहे.
त्यातच कोरोनाचे रूग्ण तालुक्यात व शहरात दिवसेंदिवस वाढतच चालल्याने या वाढत्या गर्दीमुळे कोरोनाला निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी प्रशासनाने जत शहरातील बंद असलेली सि.सि.टि.व्ही. यंत्रणा त्वरित पूर्वीसारखी कार्यान्वित करावी. अन्यथा दिवाळीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सबंधित यंत्रणाच जबाबदार राहील असा ईशारा ही कांबळे यांनी दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा