योगेश मोटे यांनी सोडविला शहरातील पाणीप्रश्न;गंजीवाले गल्लीत नागरिकात समाधान
जत:प्रतिनिधी:जत शहरातील चिनगीबाबा मंदिर परिसरात गंजीवाले गल्ली भागात गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याचा पाणीप्रश्न भेडसावत होता.नागरिकांनी वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात होते.अखेर युवा नेते योगेशबाबा मोटे यांच्या प्रयत्नातुन गंजीवाले गल्ली येथे पाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांतुन समाधान व्यक्त केले जात आहे.
याबाबत माहिती अशी की,जत शहरातील चिनगीबाबा मंदिर परिसरात गंजीवाले गल्ली भागात गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याचा पाणीप्रश्न भेडसावत होता.नागरिकांनी वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात होते.या भागातील नागरिकांनी त्यांची समस्या युवा नेते योगेशबाबा मोटे यांना सांगितली. तात्काळ योगेशबाबा मोटे यांनी स्वखर्चाने पाईपलाईनची व्यवस्था केली.नगरसेवक टीमु भाई एडके यांच्या मदतीने तेथील नागरिकांची पाण्याची व्यवस्था केली. अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या मिटल्याने नागरिकांतुन समाधान व्यक्त केले जात आहे.
★चौकट★
गेल्या अनेक वर्षांपासून गंजीवाले गल्ली येथे पाण्याची समस्या युवा नेते योगेशबाबा मोटे व नगरसेवक टीमुभाई एडके यांच्या प्रयत्नाने मिटली.यामुळे या भागातील नागरिक भावूक झाले होते.त्यातील एका महिलेने 'बेटा तुम ऐसेही अच्छा काम करो, ऐसें हम आपको दुवा देते है!हम तुम्हारे साथ है अशी भावनिक साद दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा