जागर फाऊंडेशन सामाजिक संस्थेतर्फे दिपावलीचे फराळ वाटप
जत/प्रतिनिधी:
गोर-गरीब नागरिकांना देखील दिवाळीचा आनंद मिळावा या उद्देशाने जागर फाऊंडेशन मार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबद्दल गोल्लार समाज्यातील सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत. संस्थेचे अध्यक्ष परशुराम मोरे हे संस्थेतर्फे मागील सहा वर्षांपासून गोल्लार वस्तीतील नागरिकांना जमा करून त्यांना दिवाळीचे फराळ वाटप करतात.
यावेळी बोलताना मोरे म्हणाले की, आज गरीब वस्तीत मिठाई व फराळ वाटप केल्यामुळे गोल्लार वस्तीतील लहान मुलांनी खऱ्या अर्थाने दिपावली साजरी केली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अमोल कुलकर्णी, युवा नेते योगेश मोटे,ओंकार कांबळे,अविनाश साळे, विजय कांबळे, प्रतीक संकपाळ,सुनील शिंदे, प्रसाद शिंदे,सागर पाथरूट यांचेसह पदाधिकारी व नागरिक उपस्थितीत होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा