मानव मित्र संघटना आसंगी तुर्क जळीतग्रस्त कुटुंबियांच्या धावली मदतीला ◆जिवनावश्यक किट व रोख पाच हजार रुपयाची मदत ◆
जत/प्रतिनिधी:-
आसंगी तुर्क येथील ता जत येथील भौरवा ईश्वर पुजारी यांच्या झोपडीवजा घराला आग लागून गॅसचा स्फोट होवून मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच जळीतग्रस्त कुटूंबियांना श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने तातडीने मदत जिवनावश्यक किट व रोख पाच हजार रुपये देण्यात आले. ही दुर्देवी घटना घडल्यानंतर अवघ्या तासाभरात चिकलगी मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत त्या कुटूंबियांना पोच करण्यात आली हे विशेष.
जत तालुक्यात सक्रिय असलेल्या श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम तसेच अडचणीत सापडलेल्यांना मदतीचा हात दिला जातो. उटगी येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत, सनमडी येथील पिंटू धायगुडे हा तरुण पुरात वाहून गेला, अचकनहळळी येथील शेतकरी विनायक शिंदे, प्रतापूर येथील लता गुलाब मोटे यांच्या झोपडीत गॅस सिलेडरचा स्फोट होवून नुकसान झाले. या कुटूंबियांना श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी मदतीचा हात दिला.
जत तालुक्यातील आसंगी तुर्क येथे गॅसचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी सकाळी दहा ते अकराच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. या दुर्देवी घटनेत झोपडीत ठेवलेले रोख 70 हजार, तीन तोळे सोने, 25 पोती धान्य व संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
या घटनेची माहिती मिळताच तासाच्या आतच चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना आसंगी तुर्क येथे पोहचली. श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सदस्य दत्ता सावळे, मिरासाहेब मुजावर, जाधव मिस्त्री, पाटील, मायाप्पा मोटे, सरदार मुजावर, मनगिरी डोंबळे, रावसाहेब डोंबाळे, श्रीमंत मोटे आदी उपस्थित होते
श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेने पुजारी कुटूंबियांना धीर दिला व त्यांना जीवनावश्यक किट व रोख पाच हजार रुपये देत मदतीचा हात दिला.
■ मानव मित्र संघटनेचे मानले आभार
ही घटना घडलेली कळताच श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना लगेच आमच्या घरी पोहचली व त्यांनी आम्हाला धीर देत तातडीने मदत केली. त्यांची ही मदत लाख मोलाची असल्याचे सांगत भौरवा पुजारी यांनी तुकाराम बाबा महाराज व मानव मित्र संघटनेचे मनापासून आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा