जत तालुक्यातील बेकायदेशिर धान्य वाहतूक करणा-या वाहन मालक व त्या सबंधीत दोषी आढळलेल्या सरकारी धान्य दुकानदारांवर गुन्हे दाखल व कठोर कारवाई - तहसिलदार सचिन पाटील
जत/प्रतिनिधी:
जत तालुक्यातील बिळूर,बनाळी,दरिबडची या ठिकाणी शासकीय धान्य साठा वाहून काळाबाजारात विक्री केला जाणार असलेच्या संशयावरुन पकडणेत आलेल्या वाहनांवर व वाहनाचे चालक-मालकांवर जिवनावश्यक वस्तूची बेकायदेशिर वाहतुक केले जात असलेचे कारणास्तव गुन्हे दाखल करणेत आलेले आहेत. त्याबाबत वाहन चालक दुकानदार व सापडून आलेल्या वाहन परिसरातील रास्त भाव धान्य दुकानदारांची कसून चौकशी व तपासणी करुन संबंधीत दोषींवर कडक कारवाई करणेबाबतची प्रक्रिया महसूल व पुरवठा विभागाकडून करणेत येत असलेचे तहसिलदार सचिन पाटील यांनी या पत्रकाव्दारे कळविले आहे.
मागिल पंधरा दिवसात जत तालुकेतील एकूण तीन ठिकाणी बेकायदशिर धान्य वाहतूक करत असलेली वाहने ग्रामस्थांनी पोलीसांकरवी महसूल प्रशासनाला पकड़न दिलेली आहेत. त्यामध्ये आढळून आलेला धान्य साठा शासकीय असलेचा सापडून आलेल्या गोणीवरुन निदर्शनास आलेला आहे. या प्रकरणी तालूकेतील शासकीय धान्य दुकान चालवणारे परवानाधारक व दुकानाशी संबंधीत असणारे लोक पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांचे वर रितसर फौजदारी गुन्हे दाखल करणेत आले आहेत. शिवाय त्यांची कसून चौकशी चालू असून तालूकेतील जनतेच्या तक्रारीवरुन व ग्रामस्थांनीच रंगेहात वाहणे पकडून दिलेने सापडून आलेला धान्य माल हा रेशनींग लाभार्यांचा असलेचा व त्यांना धान्य माल न देता तो काळयाबाजारात बेमालूम विक्री केले जात असलेच्या तक्रारीच्या अनुशंगाने बिळूर,बनाळी,डफळापूर,दरिबडची येथील दुकानांच्या कसून चौकशी व तपासणी महसूल च्या अधिकारी व कर्मचारी यांचे पथकाकडून तातडीने करुन त्याचा अहवाल मा.जिल्हाधिकारीसोज, व मा. जिल्हा पुरवठा अधिकारीसोज, यांचे कार्यालयास पाठवणेत येत आहे या प्रकरणी दोषीं रेशन दुकानदारांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नसून त्यांचेवर कडक कारवाई होणेबाबत वरीष्ठ कार्यालयास अहवाल सादर केला जात आहे. असे तहसिलदार सचिन पाटील यांनी सांगितले.
तरी तालुक्यातील योजनापात्र लाभार्थी यांनी रास्त भाव धान्य दुकानदाराकडून पॉस मशिनव्दारे धान्य खरेदी केलेनंतर रोखीची पावती घ्यावी. व पावतीनुसार होणारी रक्कमच दुकानदारास दयावी. दुकानदार पावती देणेस टाळाटाळ व नकार देत असलेस त्याबाबतची लेखी तकार ग्रामस्तरावरील दक्षता कमीटी अध्यक्ष सरपंच व सदस्य सचिव तलाठी यांचेकडे करणेत यावी.
धान्य वितरण प्रणाली बाबत माहिती देताना सचिन पाटील यांनी नमुद केले आहे की, तालुक्यातील जे अन्न सुरक्षा योजना व अंत्योदय योजना लाभार्थी आहेत व ज्यांचे नावाची पॉस मशिनवर १२ अंकी नंबरने नोंद आहेत अशा पात्र शिधापत्रिका धारकांस कार्डातील एका सदस्याचा पॉस मशिनवर अंगठा लावून सदर योजनांचा लाभ दिला जात असतो.ऑनलाईन वितरणप्रणाली आधारसिडींग निगडीत असलेने शिधापत्रिकांतील सर्व सदस्यांचे आधार कार्ड पॉस मशिनला जोडणी करणे अत्यावश्यक असलेने ज्या योजनापात्र शिधापत्रिकांतील लाभार्थ्यांनी अद्यापि आधारकार्ड जोडणीसाठी दुकानदारांकडे दिलेले नाही त्यांनी ते तात्काळ देणेची कार्यवाही करावी.
स्वस्त धान्य दुकानदाराकडून अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकामधील प्रति व्यक्ती ३ किलो गहू दर रु.२/- तर प्रति व्यक्ती २ किलो तांदळ दर रु./- असे मिळून पाच किलो धान्य प्रति व्यक्ती देय आहे. तर अंत्योदय योजनाअंतर्गत प्रति कार्ड धारकांस गहू २५ किलो व तांदुळ १० किलो असा मिळून ३५ किलो धान्य आणि प्रति अंत्योदय कार्ड धारकांस १ किलो साखर किंमत रु.२०/- देय आहे.या नियोजित प्रमाण व दरापेक्षा जास्त व कमी प्रमाण व दर परस्पर दुकानदारांकडून आकारणे बेकायदेशिर आहे. तसे आढळलेस किंवा तशी तक्रार लाभार्थ्यांकडून ग्राम दक्षता समिती किंवा तहसिल कार्यालयास प्राप्त होताच त्याची गंभीर दखल घेवून सखोल चौकशीअंती दोषी रास्त भाव धान्य दुकानाविरोधात जिवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ दुरुस्ती आदेश २०१३ नुसार कडक कारवाई करणेकरीताचा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयास सादर करणेची कार्यवाही केली जाते असे या पत्रकाव्दारे जत तहसिलदार सचिन पाटील पाटील यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा