दुष्काळाचे नंदनवन करण्यासाठी तरुणांनी एकत्र यावे - तुकाराम बाबा महाराज
जत/प्रतिनिधी:
तरुण म्हटलं की उत्साह,जोश ,क्रिकेट स्पर्धा असो की कोणताही उत्सव असो तरुण उत्साहाने सहभागी होतात त्याच पद्धतीने जत सारख्या दुष्काळी तालुक्याचे नंदनवन करण्यासाठी युवकांनी जलचळवळीसाठी एकत्र येण्याचे आवाहन चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी केले.
निमित्त होते जत तालुक्यातील अंकलगी येथील मल्लिकार्जुन क्रिकेट क्लबच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
मल्लिकार्जुन क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित स्पर्धेत 38 संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस परमेश्वर मलकाप्पा बिराजदार, द्वितीय बक्षीस शाकीब इंजिनिअरिंग वर्क्स संखचे सिराज मिस्त्री, तर तृतीय बक्षीस
रमेश मेत्री यांनी दिले होते.
यातील प्रथम बक्षीस देवर निंबर्गी क्रिकेट क्लब, द्वितीय बक्षीस मल्लिकार्जुन क्रिकेट क्लब अंकलगी तर तृतीय बक्षीस सिध्दनाथ क्रिकेट क्लबने पटकावले
बक्षीस वितरण प्रसंगी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले, जत तालुका आजही दुष्काळात आहे. जतची म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. जतची प्रगती व्हायची असेल तर जतच्या प्रत्येक गावात पाणी येणे महत्वाचे आहे. यासाठी प्रत्येक गावातील युवकांनी संघटित होत जलचळवळ चालवली पाहिजे. युवकांनी जलचळवळीला प्राधान्य द्यावे असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा