जत मध्ये शॉपिंग मॉल व अद्यावत बस स्थानक उभारावे - पापा कुंभार

जत/प्रतिनिधी: 

जत शहरातून जाणारे विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर तसेच मंगळवेढा ऐगळी या राज्यमार्गावरील मोक्याच्या ठिकाणी जत आगाराची एस.टी. परिवहन विभागाची जागा असून या जागेवर बी.ओ.टी. मधून अद्यावत असे शाॅपिंगमाॅलसह सर्व सोईनेयुक्त बसस्थानक उभे करण्यासाठी जतचे क्रियाशील आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी जत येथिल सामाजिक कार्यकर्ते व शिवनेरी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यानी केली आहे. 

कुंभार म्हणाले की,आपल्या शेजारील कर्नाटक राज्यातील आपल्या तालुक्याच्या सिमेलगतची सर्वच परिवहन विभागांतर्गत असलेली बसस्थानके अद्यावत व सर्व सोईनेयुक्त अशी नव्याने उभारली आहेत. 

जत बसस्थानकाची अवस्था तर फारच बिकट झाली असून या स्थानकावर प्रवाशांचे सोइपेक्षा गैरसोईच जास्त आहेत. या बसस्थानकाची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. 

जत तालुक्यातील एकूण गावाचा विचार केला तर जतला सर्व सोईनेयुक्त असे अद्यावत बसस्थानक यापूर्वीच होणे अपेक्षित होते. पण याकडे कोणीही लोकप्रतिनिधीनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे हा बसस्थानकाचा प्रश्न प्रलंबीतच राहीला आहे. 

जत एस.टी.आगाराची विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर तसेच मंगळवेढा ऐगळी या राज्यमार्गावर चारपाच एकर इतकी जागा आहे. या जागेवर सद्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एस.टी. च्या दक्षिण बाजूने व उत्तर बाजूने अतिक्रमणे झाल्याने एस.टी.आगाराची बांधकाम करणेबाबत अडचण निर्माण झाली आहे. 

जतचे क्रियाशील आमदार विक्रमसिंह सावंत यांनी विशेष प्रयत्न करून जत येथिल एस.टी. आगाराचे विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तसेच मंगळवेढा ऐगळी या राज्यमार्गावरील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या एस.टी.च्या स्वताच्या जागेवर बांधा,वापरा आणि हस्तांतरीत करा (बी.ओ.टी.) या तत्वावर सर्व सोईनेयुक्त असे अद्यावत बसस्थानक उभे करण्यासाठी पुढाकार घ्यावा. या जागेवर महामार्गालगत असलेल्या जागेवर भव्य असे सर्व सोईनेयुक्त असे शाॅपिंगमाॅलसह भाडेतत्वावर दुकानगाळे तयार करावेत. 

यामुळे एस.टी. आगाराचे उत्पन्न ही वाढेल व जत शहराच्या सौंदर्यात आणखी भरही पडेल. यासाठी क्रियाशील आमदार श्री. विक्रमसिंह सावंत यांनी पुढाकार घ्यावा. राज्याचे परिवहन मंत्री ना. श्री. अनिलजी परब यांची भेट घ्यावी तत्पूर्वी जत च्या नविन बसस्थानकाचा आराखडा तयार करावा व तो परिवहन मंत्री यांना भेटून समक्ष त्यांच्याशी भेटून या नविन बी.ओ.टी.तत्वावर बांधण्यात येणारे जत बसस्थानकासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा ही पापा कुंभार यानी व्यक्त केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक