ओंकार स्वरूपा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा उद्घाटन सोहळा संपन्न◆पालकाच्या संमतीपत्रासह जुनिअर कॉलेजची आज सुरुवात◆


जत/प्रतिनिधी:
येळवी ता जत येथील सामाजकार्यात अविरत सेवा करणारी ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्था संचलित ओंकार स्वरूपा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा उद्घाटन सोहळा चिक्कलगी मठाचे मठाधिपती ह भ प तुकाराम महाराज तसेच जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पाराया बिराजदार, जत तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुजना(नाना) शिंदे ,ज्येष्ठ नागरिक पंचाक्षरी (काका) अंकलगी यांच्या हस्ते पार पडला.

उदघाटन प्रसंगी बोलताना, तुकाराम बाबा म्हणाले,ओंकार स्वरूपाचे दीपक अंकालगी व संतोष पाटील यांनी लावलेले वृक्ष भविष्यात मोठी भरारी घेईल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी पंचक्रोशीतील प्रतिष्ठित व्यापारी राजाभाऊ अंकलगी, येळवीचे सरपंच कुमार पोरे , उपसरपंच सुनील अंकलगी, रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजित पाटील, अल्पसंख्यांक अध्यक्ष नजीर भाई शेख,दरयाप्पा (आप्पा) जमदाडे,शिवाजी माने, खैरावचे सरपंच राजू घुटुकडे, रेवेवाडीचे वाडीचे सरपंच ब्रह्मा रेवे, संस्थेचे अध्यक्ष दिपक (आण्णा) अंकलगी,सचिव तथा ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील ,सचिन मदने, शंकर (तात्या) आवटे, भाऊसो कदम,मधुकर नरळे,संतोष स्वामी, नवनाथ पवार, तुकाराम सुतार, राजू कदम, सचिन स्वामी यांच्यासह शशिकांत महाराज गानमोटे, गौरीहर पतंगे,कोंडीबा घुटुकडे, बजरंग चव्हाण, रामकृष्ण गंगणे, ज्ञानेश्वर माने तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेतर स्टॉफ उपस्थित होता.
शेवटी आभार दीपक अंकालगी यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule