जत-सांगली रस्त्यांची लागली वाट...! त्वरित रस्ता दुरूस्ती करा अन्यथा भाजप युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन -बसवराज पाटील


जत/प्रतिनिधी:
जत-सांगली रस्त्याची अवस्था सध्या दयनीय बनल्याने जत ते डफळापूर पर्यंतच्या या १७ किलोमीटरच्या खड्डेमय रस्त्यांमुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांना शारीरिक व्याधींचा त्रास वाढला आहे. अनेकांमध्ये पाठीचे व मानेचे दुखणे बळावले आहे. बऱ्याचदा गरोदर माता व वृद्धांसाठी हा रस्ता पार करणे म्हणजे मैलाचा दगड ठरतो. रात्री- अपरात्री हा रस्ता वाहनांसाठी घातक ठरत आहे. शारीरिक व्याधींचे मूळ ठरलेल्या या रस्त्यांची चांगल्या दर्जाचे साहित्य वापरून दुरुस्ती करावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केली आहे.  सध्या कोरोना महामारीच्या काळात काही रूग्णांचे अचानक प्रकृती बिघडल्याने पुढील उपचारासाठी सांगली मिरजेच्या हॉस्पिटलमध्ये रूग्णांना नेण्यासाठी या रस्त्याचा वापर होतो पण हा रस्ताच पूर्णपणे उखडून गेल्याने रूग्ण वाटेतच दगावण्याची दाट शक्यता आहे असे असूनही या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे साफ दुर्लक्ष असून हा रस्ता दुरूस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते कुणाच्या मरणाची वाट पहात आहे का! असा सवालही भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule