Please Don't under estimate to Someone...sachin Zende
जय भीम
मी सचिन झेंडे सेक्टर अध्यक्ष माडग्याळ( BSP )ता.जत, सांगली.....
राजकीय कुरघोडी काय असतात याचा आज मला प्रत्यक्ष आलेला पहिला अनुभव मी आपल्याशी शेअर करतोय....
मी व्हसपेट चा राहिवाशी आहे, गेली अनेक वर्षं मी माझ्या कुटुंबासमवेत व्हसपेट मध्ये आजोळी राहतो पण अचानक एक दिवस असा येतोय कि मला माझ्याच गावातुन हाकलून लावण्याची धमकी माझा सख्खा मामा देतो आणि याला कारण असतंय राजकारण... राजकीय कुरघोडी इतक्या खालच्या थराला जाऊन केल्या जातात याचा प्रत्यय याची देही याची डोळा आला....
प्रसंगवर्णन करण्या अगोदर थोड पाठिमागे जातो...
मला अगदी लहानपणापासून स्टेज वरुन बोलायला खूप आवडतं, ती आवड अलीकडच्या काळात सामाजिक व राजकीय क्षेत्रात निर्माण झाली...व स्वतः ला सिद्ध करण्याचा प्रयत्न चालू झाला....मग राजकीय व्यासपीठ बहुजन समाज पार्टी जत च्या माध्यमातून मिळाले 7 ऑगस्ट 2021 रोजी, व त्यानंतर सतत संघटन वाढीचे कार्य करत असताना , साहजिकच अनेकांच्या नजरेत आलो. विशेषकरून गावातील राजकीय पुढारी... आणि इथंच सुरू झाली संघर्षाला सुरुवात...
वरचेवर घरातून सूचना मिळू लागल्या, मामांनी एकदा त्यांच्या कार्यकर्त्यां समोर अतंत्य गलिच्छ भाषेत बोल सुनावले पण याकडे मी दुर्लक्ष केले. पण ही बाब माझा मित्र विनायक ला खटकली.... व ते त्याने बोलून ही दावले
यानंतर संपर्क कार्यालय व व्हसपेट बुथ चे उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे समजल्यानंतर गावातील काही पुढारी लोकांनी माझ्या मामा चे कान भरवले व त्यांना सांगितले की तुझा भाचा जर उद्या तालुक्यात मोठा झाला तर तुझी किंमत शुन्य होईल आणि असे त्यांनी बोलुनही दाखवले .. आणि याचीच भीती खाऊन , स्वतः ला खूप मोठा नेता समजणारा माझा मामा यांनी मला अर्वाच्च भाषेत शिविगाळ करुन माझ्या अंगावर फोडलेले लाकुड घेऊन अंगावर धावून आला... यावेळी माझ्या सहकारी मित्रांनी, संतोष चौगुले , बाबु उबाळे , गणेश कांबळे, मनगेनी हुवाळे , सागर हुवाळे मुकेश हुवाळे बापू हुवाळे यांनी त्यांना अडविले... प्रकरण इथे थांबले पण आता मला राहुन राहुन एक प्रश्न पडतोय.... नवीन पिढी ने राजकारणात पाऊल टाकणे गुन्हा आहे का? बरं एखादा मुलगा जो आपल्या समाजातील आहे आणि तो एखाद्याचा नातेवाईक आहे.. आणि त्याची प्रशिद्धि वाढत असेल तर तु हे करु नकोस कारण याच्याने माझं नुकसान होत आहे असे म्हणणे कितपत योग्य आहे, आणि ज्या राजकीय लोकांना वाटत़य हा डोईजड होईल म्हणून त्याला रोखण्यासाठी त्याच्या घरच्याचा वापर करुन घेणं किती योग्य आहे, या सर्व बाबींचा विचार करता एक गोष्ट लक्षात येते की अतिशय विखारी, मनुवादी विचारसरणीचे लोक फुले , शाहू आंबेडकरांच , महात्मा गांधी च नाव घेऊन अतिशय घानेरडं राजकारण करतात...
यातुन एक गोष्ट शिकायला मिळाली की,
एखाद्याला तेवढिच किंमत द्या जेवढी तो आपल्याप्रती करतो...
आणि
आदरयुक्त भीतीला काही अतिशहाणी मंडळी षंढ समजतात.....
सचिन झेंडे
माडग्याळ सेक्टर अध्यक्ष
बहुजन समाज पार्टी , जत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा