कोसारी येथे पार पडली शेतीशाळा
कोसारी /प्रतिनिधी
दिनांक 21/05/2020
*कोसारी ( चव्हाण मळा) येथे कृषी विभाग जत व ग्रामीण विकास संस्था, कोसारी यांच्या वतीने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पार पडली शेतीशाळा . यावेळी मार्गदर्शन करताना कृषी सहाय्यक परशुराम मळळी साहेब यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षण या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी शेतातील माती कोणत्या ठिकाणची घ्यायची व कशा पद्धतीने घ्यायची व त्याच बरोबर बाजरी पेरणी या विषयावर बियाणे कोणती पेरावीत व त्याच बरोबर बीज प्रक्रिया कशी करायची खते कोणती व कशा पद्धतीने उपयोग करावे व खताचे प्रमाण कसे ठेवायचे या सर्व विषयावर चांगली माहिती सांगितली त्यावेळी त्यांचे सहयोगी एस. एस. नाटेकर हे ही उपस्थित होते.*
*कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रम पार पडला त्यावेळी 30 शेतकरी उपस्थित होते त्या मध्ये चंद्रकांत चव्हाण साहेब, गोरख खडतरे, तुकाराम नरुटे, पांडुरंग वाघमोडे, योगेश कुंभार, सदाशिव चव्हाण असे प्रमुख शेतकरी उपस्थित होते. या अगोदर त्यावेळी ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष विवेक टेंगले,सागर गुजले, विशाल महारनुर हे उपस्थित होते. यासाठी विशेष परिश्रम ग्रामीण विकास संस्थेचे विश्वास खटके यांनी घेतले आहे.*शेवटी कृषी सहाय्यक मळळी साहेब आणि शेतकरी यांचे आभार अध्यक्ष विवेक टेंगले सर यांनी मानले. कोरो इंडिया व आशामंत फौंडेशन सोलापूर आणि ग्रामीण विकास संस्था, कोसारी या संस्थेच्या वतीने कोसारी गावामध्ये लोक सहभागातून पाणी व्यवस्थापन या विषयावर काम चालू आहे 16 शेतकऱ्यांना मोफत मागेल त्याला शेततळे या योजनेतून मोफत अर्ज भरून दिले आहेत त्यातील 12 शेतकऱ्यांना कृषीविभाग ने मंजुरी दिली आहे*
..........📚✍
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा