*परिस्थिती ची जाणीव ठेवुन घरभाडे गाळाभाडे सह तत्सम जिवनावश्यक वस्तुंवर आकारण्यात येणारे बील माफ करावेत.... . रावसाहेब हेगडे*

 रावसाहेब हेगडे अखिल भारतीय होलार  समाज संंघटना  ता.अध्यक्ष

 प्रतिनिधी माडग्याळ.
कोरोणा पार्श्वभूमीवर घातलेल्या लॉकडाऊन मुळे राज्यातील विविध भागातील नागरिकांना काम नसल्यामुळे उपासमारीने जनता त्रस्त आहे, शहरातून गावाकडे आलेला कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर बेरोजगार झाल्याची परिस्थिती आहे.या कठीण परिस्थितीत गोरगरीब जनता जगण्यासाठी धडपडत आहेत,  हाती काम नाही, पगारही नाही, आणि एकवेळच्या जेवनाची व्यवस्थाही नाही, लॉकडाऊन संपल्यानंतर आणखी बर्याच गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे, त्यात रोजंदारीवर , शेती वर अवलंबून असणारा मजुर हवालदिल झाला आहे. त्यात लघुउद्योग करणारे , यांच्यासमोर गाळाभाडे , लाईटबील, च्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, 
त्यामध्ये प्रामुख्याने घरभाडे, दुकान गाळा भाडे, लाईट बील, मुलांच्या शाळेच्या फी , राशन या समस्या आ वासुन उभ्या राहणार आहेत, या बाबींचा विचार करता प्रशासकीय यंत्रणांनी या सर्व समस्या निस्सारण करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे,शाळा , महाविद्यालयांना परिपत्रके काढुन योग्य सुचना द्याव्यात , दुकान गाळे मालकांना भाड्या साठी तगादा लावु नये अशा आशयाची शासकीय पत्राद्वारे सुचना द्याव्यात. असे मत रावसाहेब हेगडे यांनी मांडले व यावर आपण लवकरच अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देणार असल्याचे सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule