शेतकऱ्याचे वीजबिल माफ व्हावे - कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांची मागणी
जत/27
कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य चे नुतन जत तालुका अध्यक्ष मा.प्रदिप नागणे नूतन जत तालुका कार्यध्यक्ष मा.संग्राम शिंदे यांनी जत चे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली की,कोविड 19 मुळे शेतकरी आणि शेतीमालाच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतीपंप वीजबिल माप व्हावे ही विनंती केली,त्यास आमदार साहेबांनी पाठपुरावा करुन योग्य न्याय देण्याचे अश्वासन दिले.
निवेदनात सविस्तर म्हंटले आहे की महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत आज वैश्विक महामारीच्या संकटाला तोंड देत आहे.समोर बाजारपेठा खुल्या नसल्या कारणाने असंख्य शेतकऱ्यांना शेतीमाल शेतातच कुजून गेला आहे.शेकऱ्यांचे सर्व आर्थिक मिळकतीचे मार्ग खुंटले आहेत.अश्यातच शेतीपंपाची येणारी मोठ्या रक्कमांची विजबिले गरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी आर्थिक भुर्दंड ठरत आहे.कोविड 19 च्या या संकटात घरखर्च सांभाळून शेतीपंपाच्या विजबिलाच्या खर्चाचा मेळ घालणं शेतकऱ्यांच्या आर्थिक आवाक्याबाहेर गेलं आहे.
अश्या या संकटाच्या काळात लॉकडाऊन च्या कालावधीतिल साधारणतः तीन महिन्यांची शेतीपंपाची विजबिले माफ करणेत यावेत अथवा अर्थव्यवस्थेचा विचार करता निदान निम्मी सवलत तरी देणेत यावी ही विनंती.या निर्णयाने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.या सर्व कार्यासाठी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.जयदीप ननावरे,सांगली जिल्हा अध्यक्ष विश्वजित पाटील,जिल्हा उपाध्यक्ष वैभव शिंदे,प्रवक्ता ऋषिकेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा