वंचित बहुजन आघाडीचे ता.अध्यक्ष अमोल साबळे यांचा वाढदिवस मास्क व सॅनिटाईझर वाटप करून साजरा
प्रतिनिधी माडग्याळ
जत तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अमोल साबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मास्क व सॅनिटाईझर वाटप करण्यात आले. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या रूपाने आलेले संकट पाहता वाढदिवस साजरा करणे टाळत सामाजिक बांधिलकी जपत,
पोलिस अधिकारी व इतर कर्मचारी यांना मास्क व सॅनिटाईझर वाटप करण्यात आले .यावेळी पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सह इतर पोलीस कर्मचारी, भारिप तालुका अध्यक्ष संजय कांबळे , शहर अध्यक्ष प्रशांत झेंडे, जाविर सर, दिपक कांबळे, सुरेश कोळी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा