श्रीराम लाईफ इन्शुरन्स ,सांगली शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले मुख्यमंत्री सहाय्यता नीधीत 14000रु जमा


सांगली/03
कोरोणा विषाणूच्या पार्श्वभूमी वर संपुर्ण देशात लॉकडाऊन ची परिस्थिती असुन सर्व व्यवसाय, उद्योगधंदे ठप्प आहेत, अशावेळी देशात आर्थिक संकट येईल अशी परीस्थीती असुन ,अनेक सामाजिक संस्था, उद्योजक सरकारी, खाजगी नोकरदार आपल्या कमाईतील काही रक्कम प्रधानमंत्री सहाय्यता निधी, मख्यमंत्री सहाय्यता निधी ला फंड देत असल्याचे दिसते आहे.देशात आलेल्या या  संकटाचा सामना करण्यासाठी आपला ही हातभार लागावा या भावनेने प्रेरीत होत , श्रीराम लाईफ इन्शुरन्स ,सांगली शाखेच्या कर्मचाऱ्यांनी  मुख्यमंत्री सहाय्यता नीधीत 14000रु जमा करुन  सामाजिक बांधीलकी जपली.
यावेळी दै.जनमत ला माहिती देत असताना  
 श्रीराम लाईफ इन्सुरन्स चे सांगली जिल्हा अधिकारी . सूरज गायकवाड म्हणाले की, या कोरोणा विषाणू ने जगभर थैमान घातले असुन  , या विषाणू पासुन सुटका हवी असेल तर प्रशासनाने वेळोवेळी घातलेले सोशल डिस्टंसिग चे नियम सर्व देशवासीयांनी काटेकोर पाळणे गरजेचे आहे, तसेच सध्या आम्ही सर्व  कर्मचारी घरी राहुनच काम करत असल्याची माहिती देत , सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी त 14000रु ऑनलाईन (गुगल पे)वरुन केले असल्याचे सांगितले व असे महाराष्ट्र राज्यातील शक्य असेल त्या सर्वांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला फंड देउन या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी आपल्या टिम मधील भरत माने मिरज,सद्दाम हुसेन नद्दफ कडेगांव-खानापूर,उदयसिंग जाधव शिराळा  , विनायक माने वाळवा ,शशिकांत हेगडे जत ,सूहेल नदाफ तासगाव ,सागर सुर्यवंशी
कवठेमहांकाळ  या सर्व तालुक्यातील अधिकारी वर्गाचे अभिनंदन केले,
  सांगली जिल्हा अधिकारी . सूरज गायकवाड
 (श्रीराम लाईफ इन्सुरन्स)
net bank pAyment slip...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule