अहिल्यादेवी होळकर यांची जयंती प्रत्येक घराघरात उत्साहात साजरी करा:संतोष टेगंले
कोसारी /प्रतिनिधी .दिनांक :27/05/2020.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 295 वी जयंती 31 मे 2020 रोजी असुन सध्या संपुर्ण जगावर कोरोना या महाभयानक विषानु व्हायरसचे संकट असताना अशा परिस्थितीमध्ये एक उत्तम प्रशासक असनारी आपल्या सर्व समाज बाधवांचे आराध्य दैवत असलेल्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करणे उचित ठरणार नाही. म्हणुन सर्व अहिल्या भक्तानी आपापल्या घरीच पुरण पोळी बनवून अहिल्या मातेच्या फोटोचे पुजन करून लोकमातेची जयंती उत्साहात साजरी करावी.
जगावर आलेल्या कोरोना संकटाच्या उपाय योजनेसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.सर्व सण उत्सव,जयंती घराघरात साजरी करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 31 मे रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सरकारी सुचनांचे पालन करून शासनाच्या आदेशानुसार सहकार्य करीत त्यांच्या विचार सरणीची गरज असल्याने सर्व समाज बांधवांनी आपापल्या परीने कोरोना पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या कुटुंबाला आधार देत नियमांचे पालण करून सामाजिक उपक्रम राबवित प्रत्येक घराघरात अहिल्याबाई होळकर यांची जयंती प्रतिमेचे पुजन करून शासनाणे कोरोना संकटाच्या उपाय योजनेसाठी वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन करून परिवाराची काळजी घेऊन त्यांचा विचाराप्रमाणे सहकार्यांची भुमिका घ्यावी असे आवाहन जत पासुन अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या कोसारी पावनभुमीत जन्म घेतलेले विद्यमान सुपुत्र समाज कार्याची ओढ असलेल्या यशवंत सेना अंबरनाथ शहराध्यक्ष मा.श्री. संतोष टेगंले यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा