पारधी समाजातील चौघांची निर्घुण हत्या : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन
रेंदाळ प्रतिनिधी दि.१९
जमिनीच्या वादातून पारधी समाजातील चार लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली. हा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये अंबेजोगाई (केज) तालुक्यातील वडगाव या गावात झाला.त्या घटनेची चौकशी करून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
जग एकीकडे कोरोनाशी लढतोय तर भारतात जातीवादी ,धर्मवादी लोकांनी पुन्हा एकदा क्रूर चेहरा जगासमोर आणला आहे.या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.आरोपी विरूद्ध कठोर कारवाई व्हावी म्हणून म्हणून हुपरी पोलिस ठाण्याला वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निवेदन दिले.यावेळी आय.टी प्रमुख सुमित कांबळे , पांडुरंग माणकापूरे , प्रशांत कुरणे , शितल कांबळे , सिध्दार्थ कांबळे आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा