सुकृता रूरल एम्पॉवरमेंट फाऊंडेशन, पुणे व गोल्डन अग्रो इंडस्ट्रीज, बनाळी यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनाश्यक वस्तूंचे वाटप
जत/प्रतिनिधी:
सध्या कोरोना रोगाने जगभर थैमान घातले आहे.यामुळे सर्वच लोकांचे खुप हाल होत आहे.यामध्ये शेतमजूरही भरडला जात आहे.या पार्श्वभूमीवर कामगार दिनाचे औचित्य साधून सुकृता रूरल एम्पॉवरमेंट फाऊंडेशन पुणे व गोल्डन अग्रो इंडस्ट्रीज,बनाळी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब व्यक्तीना जीवनाश्यक वस्तुच्या 50 कीटचे वाटप करण्यात आले.या जीवनाश्यक वस्तुच्या किटमध्ये 2 किलो साखर, पाव किलो चहापुड,1 किलो पोहे, 1 किलो गोडेतेल,1 किलो शेंगदाणे,खोबरेल तेल,कपड्यांचा साबण,अंघोळीचा साबण,पारले बिस्किट,भांड्याचा साबण अशा वस्तूंचा समावेश होता.
सुकृता रूरल एम्पॉवरमेंट फाऊंडेशन,पुणे ही संस्था ग्रामीण भागातील गरजू व होतकरू लोकांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करुन देणारी संस्था आहे.लोकांचे हित साधणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. आणि अशा हालाखिच्या परिस्थितीत लोकांच्या मागे उभे राहने गरजेचे आहे आणि हिच परिस्थिती ओळखून बनाळी व परिसरातील गरजू लोकाना या वस्तुचे वाटप करण्यात आले.या जिवनाश्यक वस्तू घेतेवेळी लोकांच्या मनामध्ये समाधानाची भावना दिसून येत होती.यावेळी सुकृता रूरल एम्पॉवरमेंट फाऊंडेशन पुणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री दादासाहेब सावंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी युवा नेते अविनाश उर्फमंगेश सावंत,श्री.संभाजी सावंत,श्री.राजीव पाटील,श्री.विकास सावंत व कामगार वर्ग उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा