पारधी समाजातील चौघांची निर्घुण हत्या : वंचित बहुजन आघाडी ता.जत च्या वतीने निवेदन

माडग्याळ प्रतिनिधी दि.27
       जमिनीच्या वादातून पारधी समाजातील चार लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली. हा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये अंबेजोगाई (केज) तालुक्यातील वडगाव या गावात झाला.त्या घटनेची चौकशी करून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी  वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल साबळे यांनी प्रशासकीय कार्यालयास, पोलीस प्रशासनास निवेदन देऊन केली आहे. आहे. 
        जग एकीकडे कोरोनाशी लढतोय तर भारतात जातीवादी , लोकांनी पुन्हा एकदा क्रूर चेहरा जगासमोर आणला आहे.या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला , तसेच आरोपीं वर  कठोर कारवाई व्हावी यासाठी  जत  वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निवेदन दिले. यावेळी ता. अध्यक्ष अमोल साबळे, तायाप्पा वाघमोडे, आकाश साबळे विठ्ठल व्हनखंडे, शरणाप्पा जावीर , राहुल काळे,रमेश कोळेकर, आकाश बनसोडे इ. उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule