कोरोना या महाभयानक रोगापासुन कोसारीकरांनी सतर्क राहावे:बाळासाहेब पवार


  कोसारी /प्रतिनिधी .
चीन मध्ये उगम पावुण संपुर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषानु व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण जगात बिकट अवस्था निर्माण झालेली आहे. भारत सरकारने गेल्या काही दोन महिन्यापासून संपुर्ण भारतात लाॅकडाऊन केले असता  मोठमोठे उद्योग धंदे,कंपन्या,शाळा -काॅलेजेस ,छोटी मोठी दुकाने बंद होती.या काळात लोकांच्या मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ लागल्या.रोजगारांना काम मिळेनासे झाले.यातुन लोकांच्या जगण्याचा मोठा गंभीर प्रश्न ऊभा राहीला.अलीकडच्या काळात सरकारने लाॅकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात आले. यामध्ये शेतीविषयक औषधे, किटकनाशके ,बिबीयाने यासारख्या छोट्या मोठ्या सेवा सुरू केल्या.
    लाॅकडाऊन च्या कालावधीत कोसारी ग्रामपंचायतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोसारी गावात दोन ते तीन दिवस संपुर्ण गाव लाॅकडाऊन केले होते.कोसारी ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी बिसले उपसरपंच बाळासाहेब पवार , ग्रामपंचायत सदस्य आणि कोसारी गावातील सर्व माजी सैनिक तसेच ग्रामीण विकास संस्था कोसारी यांचे महत्वाचे योगदान आहे. 
  कोसारी लाॅकडाऊन केलेल्या नंतरच्या काळात गावात रहदारी वाढलेली आहे. परगावहुन आलेल्या व्यक्तीनी त्यांची नावे  तात्काळ ग्रामपंचायत ला नोंद करायची आहेत आणि  तपासणी करून घेऊन संबंधित व्यक्तीनी चौदा ते सोळा दिवस होम क्वारनटाईन मध्येच राहावे आणि  संबंधित व्यक्तीना जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात आलेले आहेत. मुंबई पुणे,सोलापुर अशा बाहेरच्या ठिकाणाहून  कोसारी अथवा परिसरच्या गावात येणार्या सर्व व्यक्तीची तपासणी करून ग्रामपंचायत मध्ये नाव नोंदणी करायची आहे.  व त्यांना ठराविक कालावधी साठी होम क्वारनटाईन ची व्यवस्था करायची आहे. एका व्यक्ती मुळे पुर्ण गावाला व्हायरसच्या प्रादुर्भाव होऊ शकतो. उदाहरणार्थ :पारनेर मधील त्या गावचा जावई बायकोला भेटण्यासाठी सासरी गेला आणि पुर्ण गाव कोरोना बाधित करून सोडले.येवढेच नव्हे तर आपल्या जत तालुक्यातील अंकले येथील एका व्यक्तीस कोरोनाच झालेच आपणास ऐकायला मिळत आहे. सिगनहळ्ळी,घेरडी यासारख्या छोट्या गावात कोरोनाच शिरकाव झाला आहे. 
  कोसारीकरानी कोरोना पासुन दुर राहायचे आहे याची सर्वांनी जबाबदारी घ्यायची आहे. बाहेरून आलेल्या व्यक्ती नी काळजी घेऊन सुव्यवस्था जपायची आहे. समोरच्या व्यक्ती पासुन सावध  राहायचे आहे. गावात विनाकारण फिरत बसायच नाही. सरकारी सूचनांचे पालन करून प्रशासनाला मदत करायची आहे प्रत्येकाने मास्क व सॅनेटायझर चा वापर करायचा आहे. अशी माहीती कोसारी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच बाळासाहेब पवार यांनी दिली.
                 कोसारी उपसरपंच बाळासाहेब पवार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule