गोरगरीब कलावंतावर उपासमारीची वेळ... महाराष्ट्र शासनाकडुन मदत अपेक्षित...रावसाहेब हेगडे , जत ता.अध्यक्ष अखिल भारतीय होलार समाज संघटना


रावसाहेब हेगडे , जत ता.अध्यक्ष अखिल भारतीय होलार समाज संघटना

प्रतिनिधी माडग्याळ
महाराष्ट्र राज्यात विविध श्रेत्रातील लोक कलावंताची संख्या खूप मोठया प्रमाणात आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशात लाॅकडाऊन असल्यामुळे सुरसनई बॅंन्ड, बॅंजो हालगी ग्रूप, ‘वाघ्यामुरळी, गोंधळी, पोतराज, गायन पार्टी या विविध श्रेत्रात ग्रामीण व शहरी भागात अनेक   लोककलावंत आहेत. संपूर्ण लॉकडाऊन मुळे  सर्वच कार्यक्रम बंद आहेत ,अथवा त्यावर मर्यादा आल्या आहेत , लग्नसराई बंद आहेत. जागरण गोंधळ बंद आहेत. गायन पार्टीचे सर्व व्यवसाय बंद आहेत, यामुळे या सर्व लोककलावंतावर उपासमारीची वेळ आलेचे वास्तव  चित्र आहे. हाताला काम नसल्याने अशा कलावंताना आपली उपजीविका करणे अवघड झालेले आहे. संसाराचा गाडा चालविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागतेय. मुलांच्या शिक्षणासाठी अडचणी निर्माण झालेल्या आहेत. पुस्तके, शालेय साहीत्य खरेदी करणे अवघड आहे, अशा अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यां सर्व समस्या घेऊन हा कलाकार, कलावंत वर्ग प्रशासनाने जारी केले ल्या सर्व नियमांचे पालन करत जीवन जगत आहे , घरात राहुन सहकार्य करत आहेत, अशात या गरीब कलावंताचे दोन वेळच्या जेवनाची भ्रांती होत असुन , त्यांच्यावर आलेल्या या परिस्थितीचे निवारण करणे, त्यांना तुटपुंजी का होईना पण शासन स्तरावरुन या कलाकारांना मानधन स्वरूपात योग्य रक्कम यांच्याही खात्यात जमा व्हावी जेणेकरून ते यातून पुढील काही महिने, कोराणा परिस्थिती संपेपर्यंत आपली उपजीविका करतील. 
सरकार सकारात्मक पद्धतीने काम करतेय याचा आम्हाला आभिमान आहे. पण आमच्या  या मागणीकडे सरकारने सकारात्मक पद्धतीने पाहून गोरगरीब कलावंताना शासन दरबारी न्याय मिळावा असे मत,अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे ता.अध्यक्ष रावसाहेब राजाराम हेगडे यांनी दैनिक जनमत शी बोलताना मांडले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक