जत तालुक्यातील रावळगुंडवाडीत पावणे चार लाखाचे चंदन जप्त...उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पथकाची कारवाई.
जत./दि.19.05.2020,
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पथकाने केलेल्या कारवाईत जत तालुक्यातील रावळगुंडवाडी येथे पावणे चार लाखा रूपयाचे चंदनाचे तुकडे जप्त करण्यात आले आहेत. संशयित आरोपी यल्लप्पा माने रा. रावळगुंडवाडी यास पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
संशयित यल्लाप्पा माने याचे रावळगुंडवाडी येथे रहाते घर आहे, शेळया बांधणेकरीता बनवलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये बेकायदा बिगर परवाना, चोरुन चंदनाचे लाकडाचे चोरुन विक्री करीत असल्याची माहिती जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे यांना गोपनिय खब-या मार्फत बातमी मिळाली.
या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक सुभाष कांबळे, पोलीस नाईक विजय अकुल, सुनिल व्हनखंडे, वाहीदअली मुल्ला यांनी प्रथम भेट दिली व खात्री करून घेतली. त्यानंतर पथकाने अचानक धाड टाकून संशयित आरोपी यल्लाप्पा लक्ष्मण
माने (वउ-४३, रा रावळगुंडवाडी ता.जत) यास ताब्यात घेवुन चौकशी केली. माने याच्या घराजवळ असलेल्या शेळीच्या शेडमध्ये एका प्लास्टिक पोत्यात चंदनाचे एकशे सहा किलो वजनाचे चंदन जप्त केले. त्याची बाजारात पावणे चार लाख रुपये किंमत होते.
पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस
उपनिरीक्षक सुभाष कांबळे, विजय अकुल, सुनिल व्हनखंडे,वाहीदअली
जबरदस्तअली मुल्ला गजेंद्र भिसे, सागर पाटील, विठठल माळी, परमेश्वर ऐवळे, सुरेश माळी, अशोक सुर्यवंशी, कांतीलाल हिप्परकर, गोविंद चव्हाण, अनिल चव्हाण यांनी ही कारवाई केली. आरोपीस अटक करणेत आलेली
आहे.पुढील तपास जत पोलीस ठाण्याचे विनायक शिंदे करीत आहेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा