शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र आल्याने जतमध्ये शिवसेना वंचित आघाडीने एकच जल्लोष केला.

जत (प्रतिनिधी)-शिवसेना पक्षप्रमुख उद्‌धव ठाकरे व वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड प्रकाश  आंबेडकर यांनी शिवसेना व वंचित आघाडीची घोषणा केल्याने जतमध्ये मारुती मंदिर चौकात शिवसेना उद्धव ठाकरे गट व वंचित आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत व जिलेबी वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सागर पाटील. शिवसेना तालुका प्रमुख नागनाथ मोटे .तालुका संघटक बंटी दुधाळ, वंचित आघाडीचे जिल्हा सरचिटणीस  श्रीकांत हुवाळे, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी चंदनशिवे, तालुका -अध्यक्ष अमोल साबळे, शिवसेना शहरप्रमुख विजयराजे चव्हाण, उपशहर प्रमुख उत्तम थोरात , गजानन चव्हाण . कामगार सेनेचे अब्बास मुजावर, वंचित आघाडीचे तालुका सरचिटणीस बाबासाहेब कांबळे, सहसचीव हारूण इनामदार, तालुका उपाध्यक्ष दिपक मागाडे .इराप्पा केंगार, संभाजी शिवशरण, बाबासाहेब चंदनशिवे इत्यादी प्रमुख पदाधिकारी, शिवसैनीक तसेच वंचित आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येने 
उपस्थित होते.
   यावेळी बोलताना 
शिवसेना उप जिल्हाप्रमुख सागर पाटील व वंचित आघाडीचे जिल्हा सरचिटणीस श्रीकांत हुवाळे यांनी प्रबोधनकार ठाकरे व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची लढाई पुढे नेण्यासाठी महाराष्ट्रात  शिवसेना पक्षप्रमुख   उद्धवजी ठाकरे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु अँड. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना व वंचित आघाडीची यूती केल्याने गद्दारी करून मिळवलेल्या शिंदे व फडणवीस यांच्या सरकारला चपराक बसली असून त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी जत तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणूकीत शिवसेना व वंचित आघाडीच्या यूतीतून  निवडणू‌का लढवून घराघरांत उद्धवजी ठाकरे व अँड प्रकाश आंबेडकरांचे विचार घराघरां पर्यंत पोहचवून संघटना वाढीचा आम्ही जत तालुक्यातील पदाधिकायांनी निर्धार केला आहे.,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक