दिव्यांग बांधवांना अंत्योदय कार्ड द्या - तानाजी व्हनखंडे*
(आयडेंटिटी फोटो-तानाजी व्हनखंडे)
शासनाच्या दि. १७ जुलै २०१९ च्या निर्णयानुसार दिव्यांगांना त्यांच्या हक्काचे ३५ किलो धान्य आणि अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका द्याव्यात. तसेच
त्यांची दारिद्र्य रेषेखाली नाव नोंदणी करावी, अशी मागणी जत तालुका बहुजन समाजवादी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष तानाजी व्हनखंडे यांनी केली आहे.
जत तालुक्यासह जिल्ह्यातील दिव्यांगाची कोरोना काळानंतर परिस्थिती बिकट झालेली असून,सध्या दिव्यांगाना आपल्या अन्नपुरवठा योजनेतून अंत्योदय शिधापत्रिकाचा लाभ मिळत नाही. तालुक्यातील जवळजवळ सर्वच दिव्यांग बांधव या योजनेपासून वंचित राहत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन आदेशानुसार, दिव्यांगासह इतर पात्र व्यक्तींना अंत्योदय शिधापत्रिका कार्ड देताना प्राधान्य देण्यात यावे, असा आदेश आहे. असे असतानाही दिव्यांग कायदा-२०१६च्या दिव्यांग व्यक्तीं हक्क अधिनियम कायद्यानुसार दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय अन्न शिधापत्रिका योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे.या शासन निर्णयानुसार दिव्यांग, विधवा, ६० वर्षावरील व्यक्ती, भूमीहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, तसेच
कुष्ठरोगी, एचआयव्हीग्रस्त यांना अंत्योदय योजनेचा लाभ
देण्याच्या सूचना शासन निर्णयात केलेल्या आहेत. परंतु, अजूनही काही दुर्लक्षित असलेल्या दिव्यांग बंधू - भगिनींना या शासन निर्णयानुसार अंत्योदय योजनेचा लाभ अद्याप
मिळालेला नाही. त्यांना ३५ किलो धान्य मिळत नाही. काही
दिव्यांगांच्या शिधापत्रिका क प्रवर्गात आहेत. या सर्वांचा गाव
पातळीवर सर्वे करून पात्र दिव्यांगांना नवीन सुधारित
शासन निर्णयानुसार अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका देऊन
३५ किलो धान्य देण्यात यावे, अशी मागणी तानाजी व्हनखंडे यांनी शासनाकडे केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा