वामनदादा कर्डक ...
वामन तबाजी कर्डक यांचा जन्म १५ ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील देशवंडी या छोट्याशा गावी तबाजी आणि सईबाई या दांपत्याच्या पोटी झाला होता. सदाशिव आणि सावित्रा ही त्यांची भावंडे होती. वामनदादांची मराठी साहित्यातील ओळख एक तेजतर्रार असा लोकशाहीर, लोककवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता अशी बहुआयामी होती. त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते.त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांचे वडील मोळ्या विकणे, टेंभुर्णीच्या पानाच्या विड्या करून विकणे हे आणि हेडीचा व्यवसाय करीत.
कर्डकांनी लहानपणी आपल्या चरितार्थासाठी गुरे चारणे, जत्रेत कुस्त्या खेळणे असे व्याप केले होते. नंतर शिवडी येथे गिरणी कामगाराची नोकरी त्यांनी केली होती., मातीकाम, सिमेंट काँक्रीटचे काम, चिक्की विकणे, आईसफ्रूट विकणे, खडी फोडणे, टाटा ऑईल मिल मध्ये नोकरी अशी मिळतील अन पडेल ती कामे त्यांनी केली होती. त्यामुळे त्यांचा तळागाळातील लोकांशी कायमचा संपर्क राहिला. मात्र अशी कामे करत असतानादेखील त्यांनी आपला वाचनाचा छंद आवडीने जोपासला होता. या शिवाय 'लल्लाट लेख' या नाटकात घुमा या पात्राची भूमिका केली होती. शांताबाई कर्डक ह्या वामनदादांच्या पत्नी होत्या, या दांपत्याची कूस उजवली मात्र सर्वच मुले अल्पायुषी ठरली. पुढे त्यांनी रविंद्र या मुलास दत्तक घेऊन आपले नाव त्याच्या पुढे लावले. वामनदादा आणि त्यांच्या पत्नीने बौद्ध धम्म स्वीकारला होता ! ते बाबांचे कट्टर अनुयायी होते हे सांगणे नलगे..
कर्डकांनी ३ मे १९४३ रोजी पहिले विडंबन गीत लिहिले व त्यानंतर २००४ पर्यंत गीतलेखन व गायनाचा कार्यक्रम चालू ठेवला.. त्यांच्या प्रकाशित आणि अप्रकाशित मिळून साधारणतः दहा हजाराच्या आसपास गीतरचना असल्याचा अंदाज आहे. कर्डकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९४० साली नायगांव येथे पाहिले व त्यानंतर चाळीसगांव, मनमाड, टिळकनगर येथे त्यांनी आंबेडकरांच्या भाषणांत गायन केले. १५ मे २००४ रोजी वामनदादा बुद्धवासी झाले आणि आपल्या लाडक्या बाबाच्या भेटीस निघून गेले.
कर्डकांना त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप, महाराष्ट्र राज्य शासनाचा दलित मित्र पुरस्कार त्यांना मिळाला होता. अनेक ठिकाणी त्यांचे नागरी सत्कार झाले होते. मराठवाडा ‘अस्मितादर्श पुरस्कार’सह विविध संस्थांचे पुरस्कार त्यांना मिळाले होते. १९९३ला वर्धा येथे भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. या संमेलनात आपल्या अध्यक्षीय भाषणात महाकवी वामनदादा कर्डक एक वाक्य बोलले होते ते म्हणजे ' मी फकीर आहे पण आंबेडकरी आहे, मी आंबेडकरी आहे पण फकीर आहे '. आजच्या राजकारण्यांनी तसेच साहित्य क्षेत्रात स्वतःला उगीचच मोठं समजणा-यांनी त्यांच्या या कथनातून काही बोध घेण्यासारखा आहे. कर्डकांच्या निर्वाणानंतर १५ मे २००८ रोजी औरंगाबादच्या वामनदादा कर्डक प्रतिष्ठान या संस्थेने पहिले अखिल भारतीय महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन भरवले होते. औरंगाबाद येथे झालेल्या या संमेलनाचे डॉ. यशवंत मनोहर हे संमेलनाध्यक्ष होते.
वामन दादा आपल्या गाण्यात म्हणतात की, ‘शेणाचे हात लावले पेणाले‘ ज्यांचे हात नेहमी गाई-ढोराच्या शेणाने माखलेले असायचे, आता त्यांच्या हातात लेखणी आली आहे. ही लेखणी क्रांतीबा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजश्री शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच आपल्या हातात दिली ही गोष्ट आपण कधीही विसरता कामा नये.
जगात प्रतिभावंतास आणि क्रांतिकारकास सर्व प्रकारचे त्रास सहन करावे लागतात अन संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजलेला असतो, या अलिखित नियमास वामनदादा कर्डकही अपवाद नव्हते. त्यांचे आयुष्य देखील संघर्षाने भरलेले असेच राहिले.
'उद्धरली कोटी कुळे । भीमा तुझ्या जन्मामुळे,
एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात तेजाने,
तुझ्या धरती वरती अंधार दूर तो पळे -भीमा तुझ्या जन्मामुळे'
तेजस्वी भीमगीत लिहून आंबेडकरी चळवळीत अजरामर झालेल्या कर्डकांच्या नावावर आज अनेक जण खिसे भरत आहेत मात्र या महान कलावंताची झालेली भयंकर उपेक्षा भारतीय समाजाच्या अधःपतनाचे दयोतक आहे. आंबेडकरी विचारांचा नावालाच वारसा जपणारया आणि उदात्तीकरणात रमलेल्या भारतीय समाजाकडून फार अपेक्षा करणे चुकीचे आहे. मात्र ही जाणीव अत्यंत क्लेशकारक अशी आहे !

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा