29 जुलै : धनगर समाज विश्वासघात दिवसबारामतीत धनगर विवेक जागृतीचे लक्षवेधी धरणे आंदोलन सुरू
जत / PSK NEWS NETWORK
बारामती येथील 29 जुलै 2014 ही तारीख धनगर समाज कधीही विसरू शकणार नाही. यादिवशी तत्कालिन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला एसटीचे आरक्षण लागू करण्याचा जाहीर शब्द दिला. त्यानंतर तीन महिन्यांत हे फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यात धनगर समाजाच्या मतांचा सर्वाधिक वाटा होता. मात्र बोलतील तसे वागतील ते फडणवीस कसले? त्यांनी पाच वर्षे कावा करून धनगर समाजाची घनघोर फसवणूक केली. धनगर समाजाचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक खच्चीकरण केले. भारत देशाच्या पातळीवर एखाद्या समूहाची एवढी मोठी फसवणूक झाली नसेल. धनगर समाज निद्रिस्त असल्याने आपल्याला काही होणार नाही, या मानसिकतेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टिम आहे. त्यासाठी धनगर समाजातील दलाल आणि गुलाम फडणवीसांनी बरोबर घेतले आहेत, परंतु धनगर समाजातील तरूण भाजपच्या पापाचा घडा फोडल्याशिवाय राहणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे गेली तीन वर्षे आम्ही धनगर समाज विश्वासघात दिवस, आत्मचिंतन दिवस पाळून प्रबोधन करत आहोत. त्याबरोबर शासन दरबारी निवेदन देत आहोत. आज 29 जुलै 2021 ला त्याच बारामतीच्या मातीत धनगरांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचे खरे चेहरे समाजासमोर आण्ण्यासाठी प्रशासकीय कार्यलयासमोर लक्षवेधी आंदोलन करत आहोत. पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी, कोरोना संसर्गाचे नियम पाळून आम्ही मोदी, फडणवीस आणि ठाकरे सरकारचा निषेध करत आहोत. धनगर समाजाच्या दृष्टीने महाराष्ट्रात सरकारमध्ये मोठा बदल झालेला नाही. फडणवीस यांच्या काळात शिवसेना सत्तेत निम्मी हिस्सेदार होती. त्यांचे पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी आरक्षणाची लेखी आणि तोंडी आश्वासने दिली आहेत, तसेच आरक्षणाचा भंडारा उधळणार, अशा वल्गना केल्या आहेत. याच उद्धव ठाकरेंनी मुखमंत्री असताना याप्रश्नाकडे पुर्ण दुर्लक्ष चालवले आहे. सत्ताधारी असो वा विरोधक त्यांनी प्रश्नाची चर्चा नको आहे, मात्र आम्ही तसे होऊ देणार नाही. समाजाशी केलेला विश्वासघात विसरणार नाही आणि इतरांनाही विसरू देणार नाही.
- विक्रम ढोणे (मो. 9850228598)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा