जत तालुक्यातील सर्व चराऊ कुरणे शेळ्या-मेंढ्या हिंडवण्यासाठी खुली करा:सुभाष हाक्के
प्रतिनिधी जत/ psknewsnetwork
मेंढी माऊली सुखाची सावली हे ब्रीदवाक्य घेऊन मेढंपाळाच्या न्याय हक्कासाठी आणि संरक्षणासाठी मेंढपाळ आर्मी या संघटनेची स्थापना 2020साली राष्ट्रीय संसद प्रमुख अर्जुन थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनातून झाली.महेश हावगोडी जत तालुका अध्यक्ष मेंढपाळ आर्मी यांच्या संकल्पनेतुन सुभाष हाक्के कोसारी (पञकार)यांची जत तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आला.
मेढंपाळाच्या सर्व अडीअडचणी लक्षात घेऊन त्यांचा न्याय हक्कासाठी आणि संरक्षणासाठी सुभाष हाक्के यांनी जत तालुका तहसिल कार्यालय जत येथे मेंढपाळ आर्मी च्या वतीने जत तालुक्यातील सर्व चराऊ कुरणे शेळ्या-मेंढ्या हिंडवण्यासाठी खुली करण्यात यावीत या मागणीचे निवेदन देण्यात आलेलं आहे.
सदर निवेदनात असे म्हणाले की सध्या शेळ्या -मेंढ्याना चारण्यासाठी चराऊ क्षेञ ऊपलब्ध नसल्याने मेंढपाळ व्यवसाय मोडकळीस येत आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच तालुक्यातील कुरणे शेळ्या-मेंढ्या हिंडवण्यासाठी खुली करण्यात आलेली आहेत. आम्ही मेंढपाळ आपल्या प्रक्षेञामध्येही पाच वर्षे वरील प्रौढ वृक्ष असलेल्या क्षेञामध्ये शेळ्या-मेंढ्या हिंडवण्यासाठी परवानगी द्यावी. नवीन लागवड 25%भागावर करून राहिलेल्या 75%भाग शेळ्या -मेंढ्या चराईसाठी मुक्त करावा.मेंढपाळ पशुपालक आणि वन विभागाचे अधिकारी यांच्यात सलोख्याचे संबंध निर्मान करण्यासाठी वन विभागाने वेळोवेळी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत. कुरणामध्रे लागवड असलेल्या भागात वहीवाटा ,छोटे तलाव, पाणीसाठे या जागेवर अडवणुक करू नये.
या सर्व मागण्यासाठी जत तालुका मेंढपाळ आर्मी उपाध्यक्ष सुभाष हाक्के यांनी जत तहसिल कार्यालय जत येथे मा.श्री.तहसिलदार पाटील साहेब यांना देण्यात आलेलं आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, मा. विक्रम ढोणे,अनिल मदने,विलास सरगर,तुकाराम हाक्के,आकाराम हाक्के यांसह अन्य मेंढपाळ बाधंव उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा