दि.१९ जानेवारी २०२५,
मामा,
तुमचा एकुलता एक मुलगा चि.समर्थ याला त्याच्या वैवाहिक जीवनाच्या खुप खुप शुभेच्छा...🌹 त्याच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाचा, सुखाचा समाधानाचा जावो, उत्तरोत्तर त्याची प्रगती होत राहो.👍
मामा, मी या आनंदी क्षणांचा भागिदार नाही राहिलो याच शल्य कायम मला बोचत राहिल. मागील दोन ते अडीच वर्षे आपण एकमेकांच्या सुख दुःखात एकत्र होतो. तुमचा सर्वांचा सहवास मला समाजातील / माझ्या जवळचे लोक आपल्या सोबत नसल्याचे जाणीव न करुन देणारा होता. हे खरं आहे. पण जिवनात एखादी अनपेक्षीत निर्णय घ्यायची वेळ प्रत्येकावर येते,ती आमच्या वरही आली. समाजापासून बाहेर राहणे (वाळीत)काय प्रकार असतो तो पहिल्यांदाच मी अनुभवलो , माझ्या आयुष्यातील वाईट दिवस कुठले असतील तर हे.... आणि याला कारणीभूत वैयक्तिक मी स्वतः आहे अस मी मानतो . सर्वात अगोदर कुणी बंड केल असेल तर तो मी होतो. मला त्यावेळी सुचना मिळाल्या असतानाही माझ्या मतावर ठाम राहिलो , कुणाच्याही सपोर्ट ची अपेक्षा न करता, मी एकटा बाहेर पडलेलो हे साऱ्या गावाला माहिती आहे. त्यानंतर या इतर मंडळींनी एकवार एक निर्णय घेतला आणि आपण एकत्र आलो, माझ्यसह आपल्या प्रत्येकाचा यामध्ये स्वार्थ होता हि गोष्ट नाकारण्या जोगी नाही.
( *स्वार्थ या शब्दाचा शब्दशः अर्थ घेऊ नये* )
आणि पुढे आपण या अडीच वर्षांत जे काय सोसल ते एकत्र सोसल यावेळी एकमेकाना आधार दिला,साथ दिली .
पण कुठे तरी मन खात होत की आपण चुकलोय, चुक सुधारण्याची संधी ही भेटली पण वेळ चुकली , आमच्या या कृतीने तुम्ही दुःखावले गेले आहात, याची मला माणूस म्हणून पुरेपूर जाणीव आहे. पण ही कृती नक्कीच हेतुपुरस्सर न्हवती.' जेंव्हा परीस्थिती बदलता येत नसते, तेव्हा मनस्थिती बदलायला पाहिजे', आणि आम्ही सुद्धा हेच केल.
आणखी एक मामा दुनियेच्या या रंगमंचावर डबल रोल ची भुमिका मला जमली नसती, न्हवे जमणार ही नाही.
म्हणून हा निर्णय घेतला. हा सगळा शब्द प्रपंच यासाठी नाही की तुम्ही आम्हाला माफ करावं , आणि अशी अपेक्षाही नाही, पण यासाठी मला व्यक्त व्हावंसं वाटतंय की तुमच्या सह अनेक लोकांची मन मी दुखावली आहेत ज्यांना मी आदर स्थानी पाहतोय ... त्यांच्या नजरेत मी स्वतःला पडलेलो पाहत असल्याचा भास होतो आहे... पण सचिन असा नाही... मला समजुन घेणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. समजून घ्यावं अशी अपेक्षाही नाही.जाताजाता राहिला प्रश्न माझ्या मित्राचा ,माझ्या मैत्रीचा.. तर मैत्री तुटत नसते मामा.. 'तुटणारी ती मैत्री कसली मग!'
असो जे झालं ते झालं. शेवटी मी वैयक्तिक तुम्हाला एवढंच म्हणू इच्छितो..
*SORRY*😌
आपलाच
सचिन झेंडे 🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा