संख येथील एका वयोवृद्ध मागासवर्गीय महिला अत्याचार प्रकरणी न्याय मिळेल का?
प्रतिनिधी माडग्याळ
संख येथील या वयोवृद्ध मागासवर्गीय महिलेवर ज्या नराधमाने बलात्कार सारखा अक्षम्य गुन्हा केला आहे त्या आरोपी ला तात्काळ अटक व्हावी म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत व दलित पँथर ने तालुक्याच्या वतीने संख बंद करून आंदोलन केले.या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका अध्यक्ष श्रीकांत हूवाळे सर. दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक भूपेंद्र कांबळे जिल्हा उपाध्यक्ष संजय देवनाळकर.सचिव चित्रसेन कनमडी.विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राकेश कांबळे.रो.आघाडी अध्यक्ष राजेश वर्मा.संघटक इरापा केंगार.उपाध्यक्ष सूरेश कांबळे.निरीक्षक भिमराव कांबळे.उपाध्यक्ष.मलिकार्जून कांबळे.उपाध्यक्ष सर्जेराव उबाळे.संख शाखाध्यक्ष.मच्छिन्द्र धाबेकर.मूस्लिम आघाडी अध्यक्ष शब्बीर नदाफ.तसेच .दलित पँथरचे तालूका अध्यक्ष अमर कांबळे.व या दोन्ही संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हजर होते.
प्रथमदर्शनी हा मोर्चा यशस्वी झाला असे जरी संघटनेचे नेते कार्यकर्ते म्हणत असले तरी या मागासवर्गीय वयोवृद्ध महिलेला लवकरात लवकर न्याय मिळेल हा विषय थोडा सांशक वाटतो आहे , आज या ६५ वर्षीय आजी वर बलात्कार सारखा प्रसंग ओढवून १० ते १२ दिवस झाले पण आजही या प्रकरणात न्यायाची बाजू दिसतच नाही ,आजही अत्याचारी नराधम निश्चिंत , मोकाट फिरतो आहे , आजही त्याला अटक केली जात नाही , गेली १०/१२ दिवस आर पी आंय , जत कडून या प्रकरणात आरोपीला अटक करा यासाठी पाठपुरावा केला जात असताना कुटेही या चळवळी ला पोलीस प्रशासन कडून सहकार्य होत नसल्याचे दिसत आहे. याउलट हे प्रकरण राजकारण , श्रेयावाद यातच गुरफटत जात असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे, म्हणून कुठेतरी राहून राहून एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो कि, वयोवृद्ध मागासवर्गीय महिलेला न्याय मिळेल का?
संख सह जत पूर्व भाग तथा संपूर्ण जत तालुक्यात मागासवर्गीय लोकांवर अशा प्रकारचा अन्याय हा होतच असतोय आणि या सर्व प्रकारनात पिडीताला न्याय मिळालेला आहे असे क्वचित प्रसंगी घडले आहे . कारण अत्याचारी जमात किंवा अत्याचार करणाऱ्याला माहिती आहे,यापेक्षा त्याना खात्री आहे कि मागासवर्गीय समाजावर अन्याय केला तरी हे लोक फारतर मोर्चे , बंद असे प्रकार करतात आणि नंतर मिटवून घेतात , अशी मानसिकता आहे त्यामुळे हे लोक अशा विकृत गोष्टी सहज शांत डोक्याने करतात , कुठेतरी हे थांबले पाहिजे ,मागासवर्गीय लोकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणात लवकर न्याय मिळणे अपेक्षित आहे, आणि सर्वात महत्वाचे या प्रकरणात सर्वच थरातील सामाजिक भान असणाऱ्या संघटना नी न्यायाच्या बाजूने उभे राहणे अपेक्षित आहे, पण सहसा असे होत असल्याचे दिसत नाही ,फक्त आंबेडकरी विचारधारेचे लोक , समाज आणि संघटनाच न्यायां साठी झगडत असतात . हि मानसिकता बदलली गेली पाहिजे , असो या पिडीत महिलेला न्यासासाठी वाट पाहायला लागू नये ,एवढी अपेक्षा आणि न्यायासाठी झगडणाऱ्या आर पी आय आणि दलित पँथर च्या चळवळीला नक्कीच यश येईल.
सचिन झेंडे
दैनिक जनमत ,माडग्याळ
मो.९५६१६८२१५४
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा