व्हसपेठ येथील रेंज फॉरेस्ट ऑफिस पूर्ववत सुरू करावे....मनोहर हुवाळे


प्रतिनिधी माडग्याळ
सांगली जिल्ह्यातील व्हसपेट, ता. जत हे, जत पुर्व भागातील सर्वात मोठे गाव असुन  व्हसपेट ह्या गावचे वन विभागाचे क्षेत्र हे जत तालुक्यात सर्वात मोठे  क्षेत्र आहे, येथे 20/22 वर्षापुर्वी व्हसपेट येथे रेंज फॉरेस्ट ऑफिस कार्यरत होते. परंतु नंतरच्या काळात शासनाच्या , वनविभागाच्या दुर्लक्षा मुळे,सदर कार्यालय बंद करण्यात आले. व पुढील काळात या इमारतीची पडझड झाली.दि.16.07.2018 रोजी.माजी कँबिनेट मंत्री जगन्नाथ पाटील यांची स्वीय सचिव तथा   समाजसेवक मनोहर हुवाळे यांनी याबाबत उपवनसंरक्षक सांगली कडे लेखी तक्रार दिली होती,त्या अनुषंगाने  सदर कार्यालयाने या साठी 2019-20 या आर्थिक वर्षात तरतुद करण्याचे आश्वासित केले होते. पण आजतागायत कामास सुरुवात हि झाली नसल्याने, मनोहर यांनी जतचे आमदार विक्रमदादा सावंत यांना पत्राद्वारे विनंती केली आहे की, येत्या सप्टेंबर 2020 मध्ये होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा मांडुन सदर विषयास न्याय मिळवुन द्यावा अशी विनंती केली असल्याचे सांगितले. तसेच वनविभागाच्या उत्तर्रात आलेल्या पत्रात तालुक्याच्या ठिकाणी जत येथे एकच रेंज फॉरेस्ट ऑफिस असुन व्हसपेट येथे रेंज फॉरेस्ट ऑफिस ते कार्यन्वित करता येत नसल्याचे नमूद केले आहे,तसेच
व्हसपेट येथे वनपाल कार्यालय स्थापन करण्याचे प्रस्तावित असुन सन  2019-20 या आर्थिक वर्षात तरतुद करण्याचे आश्वासित केले असल्याचे पत्र मिळाल्याचे मनोहर हुवाळे यांनी सांगितले.तसेच 2019 -20  या आर्थिक वर्षात प्रस्तावित कार्याची पुर्ती न झालेस सनदशीर मार्गाने आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा प्रशासनास दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule