संख येथील वयोवृद्ध महिला अत्याचार प्रकरणी आरोपीस तात्काळ अटक करा..वंचित बहुजन आघाडी जत
प्रतिनिधी जत
संख येथील वयोवृद्ध महिला अत्याचार प्रकरणात आरोपी असलेला टोनाप्पा मायाप्पा हुबणुर या इसमावर उमदि पोलीस ठाणेत गुन्हा नोंद असला तरी, गुन्हा झाले पासुन आजपर्यंत तो फरार आहे. या आरोपी कडून पिडीत वयोवृद्ध महिला व तिच्या कुटुंबीयाच्या जिवतास धोका आहे , तेंव्हा या नराधम आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करा.. अन्यथा वंचित बहुजन आघाडी जिल्हाभर आंदोलन करेल असा इशारा वंचित आघाडी जत ने प्रशासनास निवेदनाद्वारे दिला. यावेळी
वंचित बहुजन आघाडी ता.अध्यक्ष अमोलसाबळे ,सुभाष,सव्वाखंडे, अवान्ना कांबळे,संभाजी चंदनशिवे,श्रीकांत सोनवणे, संजय कांबळे(जत ता.अध्यक्ष भारीप )आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा