जत तालुक्यातील संख येथील ६५ वर्षीय वृद्ध मागासवर्गीय समाजातील महिलेवर ३४ वर्षाच्या नराधम तरूणाचा बलात्कार उमदी पोलीसात अॅट्राॅसिटीचा अॅक्ट कायद्यान्वये बलात्काराचा गुन्हा दाखल*
जत .13.08.20
*जत दि.१३- संख ता. जत येथील एका मागासवर्गीय समाजातील ६५ वर्षीय वृद्ध महिलेवर त्याच गावातील टोपन्ना मायाप्पा हुळणूर वय ३४ वर्षे या नराधमांने रात्रीच्यावेळी तिच्या असहायतेचा गैर फायदा घेत पाशवी बलात्कार केला.*
*घटना अशी की दि. ११/८/२०२० रोजी पिडीत ६५ वर्षीय वृद्ध महिला ही संख गावाशेजारील असलेल्या तलावाजवळ शेतातील वस्तीवर बर्याच वर्षापासून वास्तव्यास आहे. तर संख गावात तिचे भाऊ व इतर नातेवाईक राहणेस आहेत दि. ११/८/२०२० रोजी रात्री ८ वाजता पिडीत महिलेची प्रकृती बरी नसल्याने औषध गोळ्या खाऊन रात्री झोपी गेली होती. त्याच रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास तिला जाग आल्याने उठून प्रकृती बरी नसल्याने पिडीत महिला तिच्या घराच्या अंगणात असणाऱ्या चुलीवर चहा करून पिण्यासाठी बसली होती. इतक्यात तिच्या घराशेजारीच राहणारा टोपन्ना मायाप्पा हुळणूर वय ३४ वर्षे हा नराधम संख गावाकडून येणाऱ्या दिशेने आपल्या मोटारसायकलवरून तिथे आला. त्याने पिडीत ६५ वर्षीय वृद्ध महिलेला विचारले की, आजी ऐवढ्या रात्री चहा का करून पित आहेस, त्यावर पिडीत महिला म्हणाली की, माझी तब्येत बरी नाही. आता जाग आल्याने थोडा चहा करून पित आहे. त्यावर नराधम टोपन्ना मायाप्पा हुळणूर या पिडित वृद्ध महिलेला म्हणाला की, ठिक आहे मला थोडा चहा दे. त्यावर पिडीत वृद्ध महिलेने त्याला चहा दिला. चहा पिऊन झाल्यावर तो नराधम त्या पिडीत वृद्ध महिलेला म्हणाला की, आजी तूझी तब्येत बरी नाही तर, चल आता लगेच माझ्या गाडीवरून तुला मी तूझ्या भावाच्या घरी सोडून येतो. थोडा वेळ थांब मी जरा शौचालयास जाऊन येतो आणि मग तूला संख गावात तूझ्या भावाकडे सोडून येतो. आरोपी शौचालयास जाऊन येईपर्यंत पिडीत वृद्ध महिला आपले आटपून आपल्या घराबाहेर त्याची वाट पहात बसली. तो परत आल्यावर तिला म्हणाला की आजी आता खूप उशीर झाला आहे, सकाळी लवकर तुला तूझ्या भावाकडे नेऊन सोडतो. असे म्हणतच त्याने तिला तिच्या घराजवळच असणाऱ्या छपरामध्ये ओढत नेले आणि तिथे जबरदस्तीने बलाचा प्रयोग करत पिडीत महिलेच्या अंगावरील कपडे काढून तिच्यावर पाशवी बलात्कार केला. घटने दरम्यान पिडीत वृद्ध महिला त्याला प्रतिकार करताना म्हणत होती की, असे करू नकोस मी तुझ्या आई सारखी आहे. तरीही नराधम टोपन्ना मायाप्पा हुळणूर यांने पिडीत महिलेचे ऐकून न घेता तिच्यावर जबरीने बलात्कार केला. त्यानंतर भयभीत व अस्वस्थ झालेल्या वृद्ध पिडीत महिलेने शेतातील असणाऱ्या आपल्या घरातच कशीतरी रात्र काढली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. १२/८/२०२० रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजता तिचा भाऊ शेतातील वस्तीवर जनावरांच्या धारापाणी काढणेसाठी आला असता, तिने त्याला वरील सर्व हकिकत सांगितली. तेंव्हा पिडीत महिलेच्या भावाने आरोपी टोपन्ना मायाप्पा हुळणूर याच्या घरी जाऊन आरोपीच्या आई वडीलास वरील सर्व हकिकत सांगून तुमच्या मुलाने माझ्या वृद्ध बहिणीशी गैरप्रकार केला असून तो कोठे आहे. त्याला बाहेर बोलवा मी त्याला सोडणार नसून त्याच्यावर पोलीसात तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले. त्यावर आरोपीच्या आई वडिलांनी सांगितले की तो घरात नसून बाहेर गेला आहे. हे प्रकरण आपण आपसातच मिटवूया असे पिडीत वृद्ध महिलेच्या भावास म्हटले, आणि त्यानंतर सदरचे बलात्काराचे प्रकरण गावातच दडपण्यासाठी आरोपीचे आई वडील व हितचिंतक असणाऱ्या संख गावातील काही सवर्ण समाजातील लोकांनी प्रयत्न सुरू केले. ऐवढ्यावरच न थांबता पिडीत महिलेस व तिच्या नातलगांना पैशाचे अमिष दाखवत भिती घालून बलात्काराचे प्रकरण गावातच दडपण्याचा प्रकार सुरू केला.*
*त्यानंतर पिडीत महिलेच्या नातेवाईकांनी प्रसंगावधान राखत लगेचच, सदर बलात्कार झाल्याची घटना पोलिसात तक्रार न देता ती गावातच दडपून टाकण्यासाठी आम्हाला पैशाचे अमिष दाखवून भीती घालून दबाव निर्माण करत असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे जत तालुकाध्यक्ष श्रीकांत हुवाळे सर यांना कळविली. त्यानंतर जत तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हुवाळे सर यांनी पिडीत महिलेच्या नातेवाईकांकडून सर्व माहिती ऐकले नंतर, त्यांनी जिल्हा उपाध्यक्ष संजय देवनाळकर, तालुका सरचिटणीस चित्रसेन कनमडी, मुस्लिम आघाडीचे तालुकाध्यक्ष शब्बीर नदाफ, विधानसभा अध्यक्ष राकेश कांबळे यांना बरोबर घेऊन संख गावात जाऊन पिडीत महिलेची आणि तिच्या नातेवाईकांची* भेट घेऊन वस्तूस्थितीची सविस्तर माहिती घेतली. *त्यानंतर ताबडतोब वरील सर्व हकिकत श्रीकांत हुवाळे सर व पिडीत महिलेच्या नातेवाईकांनी रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष सचिन जाधव यांना फोनवरून बलात्काराच्या सर्व घटनेची सर्व हकिकत सांगून आम्हाला आम्हाला पोलीसात गुन्हा दाखल करावयाचा असल्याचे सांगितले. त्यावर सचिन जाधव यांनी उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ता कोळेकर साहेब यांना फोन करून, तातडीने अॅट्राॅसिटीचा अॅक्ट कायद्यान्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यास सांगितले.* त्यानंतर पिडीत महिलेसह तिचे नातेवाईक व रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी यांनी उमदी पोलीसात जाऊन दि. *१२ /८/२०२० रोजी रात्री उशिरा २.०० वाजता अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारीत कायदा सन २०१५ अन्वये कलम ३(१)(W) (१)(२) व भादंवि कलम ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.*
*सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने लवकरच पिडीत महिलेसह तिच्या नातेवाईकांची व या गुन्ह्यातील पोलीस तपास अधिकारी जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सांगली जिल्हा पीसीआरचे पोलीस अधिकारी यांची रिपब्लिकन पक्षाचे नेते सांगली जिल्हा उपाध्यक्ष सचिन जाधव हे जत तालुकाध्यक्ष श्रीकांत हुवाळे सर, जिल्हा उपाध्यक्ष संजय देवनाळकर, विधानसभा अध्यक्ष राकेश कांबळे, सरचिटणीस चित्रसेन कनमडी यांचेसह भेट घेऊन लवकरात लवकर आरोपीला पकडून त्याचेवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच सदरचे मागासवर्गीय समाजातील वृद्ध महिलेवर झालेले बलात्काराचे प्रकरण गावातच दडपून टाकण्याचा प्रयत्न करणारे यांनाही सदर गुन्ह्यात सह आरोपी करण्याची मागणी करणार आहेत. यापूर्वी म्हणजे गेल्या दोन वर्षापूर्वीच संख गावा मध्ये शेतातील वस्तीवर राहणाऱ्या एका मागासवर्गीय ढोर समाजातील १९ वर्षीय मुलीवर ऊसातील शेतात बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. त्यावेळचे प्रकरणही अशाच प्रकारे गावातच दडपून टाकण्याचा प्रयत्न सुरू होता परंतु वेळीच जत तालुका व सांगली जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकार्यानी मोर्चा आंदोलन करून तया प्रकरणाला वाचा फोडून बलात्काराचे प्रकरण उजेडात आणून उमदी पोलीसात गुन्हा दाखल करून आरोपी व त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात मदत करणार्यांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करणेस भाग पाडले होते.*
________________________________
*मा. सचिन जाधव*
*उपाध्यक्ष आरपीआय (आठवले) सांगली जिल्हा*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा