कंटेमेन्ट झोन मधील अटी शिथिल करा अन्यथा आंदोलन करु....प्रशांत झेंडे

प्रतिनिधी जत
संपूर्ण  देशात कोरोना  सारख्या रोगाने थैमान घातले असता आज संपूर्ण  देश  लाॅकडाऊन करण्यात  आला आहे, या पार्श्वभूमीवर जत जि. सांगली येथे शहरातील काही ठिकाणे कंटेमेन्ट झोन घोषित केले असल्याने या परीसरात राहणारे लोकांचे हाल होत असल्याने चित्र पहावयास मिळत आहे.   कंटेमेन्ट  झोनचा कालावधी  14 दिवसाचा  असल्याने त्या झोनमधील  काही गरीब  व्यापारी तसेच गरीब कंटुबाचे खुप हाल होत  आहे त्यांच्या परिवाराला उपासमारीची वेळ  आली आहे म्हणून सरकारने कंटेमेन्ट झोनमधील जाचक अटी शिथिल कराव्यात किंवा  या झोनमधील कुठुंबाना मदत जाहीर करावी नाहीतर  येणार्या  काळात गरीब  व्यापारी  किंवा कुटुंब यांच्यावर उपासमारीची वेळ आली तर कंटेमेन्ट झोनच्या अटी  मान्य न करता तो झोन मोडला  जाईल  म्हणून सरकारने लवकरात लवकर कंटेमेन्ट झोनमधील अटी शिथिल कराव्यात नाही  तर  वंचित बहुजन आघाडी जत तालुका च्या वतीने सरकारच्या  विरोधात  आंदोलन छेडले  जाईल असा इशारा प्रशांत झेंडे जत शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी , यांनी दिला. ते वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या डफली बजाव आंदोलना दरम्यान बोलत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule