कोसारीत विहिरीत पडल्याने तरुणाचा म्रुत्यु

   
जत/01,Aug.20
जत तालुक्यातील कोसारी येथे शंकर संभाजी भजनावळे रा.कडलास, ता.सांगोला (वय 22) या तरूणाचा विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारच्या दरम्यान उघडकीस आली. घटनास्थळी पोलिसांनी मृत्तदेह विहिरीबाहेर काढत शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. 
मयत शंकर  भजनावळे कोसारी येथे मामाकडे कामासाठी राहत होता. मात्र  गेल्या तीन दिवसांपासून तो बेपत्ता होता. याबाबतची फिर्याद मामा रावसाहेब हेगडे यांनी जत पोलिस ठाण्यात दिली होती. शोधाशोध केली असता शनिवारी कोसारी गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हेगडेवस्ती येथील विहिरीत भजनावळे याचा मृतदेह आढळून आला.याबाबतचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल आप्पासाहेब हाक्के करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule