जागर फाऊंडेशन मुंबईत राबवतेय सामाजिक उपक्रम सॅनिटाइझर फवारणी, मास्क,जीवनावश्यक किट वाटप


जत प्रतिनिधी:
जत तालुक्यातील जागर फाउंडेशनचे मुंबई शाखेचे अध्यक्ष समाजसेवक हेमंत आयवळे यांनी मुंबईतील झोपडपट्टी परिसरात स्वखर्चाने मास्क,सॅनिटाइझर फवारणी तसेच ५०० जीवनावश्यक किटचे केले वाटप.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जागर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे वास्तवास असलेले हेमंत आयवळे हे स्वतः सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या सहकार्यसोबत कोरोनाची मुंबईमध्ये शिरकाव झाल्यापासून झोपडपट्टी परिसरात स्वखर्चाने सॅनिटायझर फवारणी करून जनतेला कोरोनविषयी जनजागृती करीत आहेत.त्यांनी आत्तापर्यंत ५०० जीवनावश्यक किट चे वाटप केले आहे.तसेच लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी मास्क चे वाटप केले.

सध्या कोरोनाचा मुंबईतील धरावी झोपडपट्टी तसेच अनेक झोपडपट्टी परिसरात कोरोनाने थैमान घातले आहे यात प्रशासना बरोबर समाजसेवक हेमंत आयवळे हे आपल्या कुटुंब व सहकार्या सोबत जिथे दुर्लक्षित भाग आहे अशा सर्व ठिकाणी जाऊन सॅनिटाइझर फवारणी करून कोरीना पासून स्वतःचा कसा बचाव करायचा याविषयी जनजागृती व जिथे जीवनावश्यक किट ची आवश्यकता असेल तिथे जाऊन वाटप करतात.

या त्यांच्या उपक्रमामुळे गोरगरीब जनतेतून त्यांचे कौतुक होत आहे.जत सारख्या दुष्काळी भागातून कामानिमित्त मुंबई मध्ये काम करत ते जतचे नाव उज्वल करत आहेत.

यामध्ये त्यांचे सहकारी दयानंद कांबळे, हरीश कदम, प्रफुल आयवळे, रुपाली (सावित्री )हेमंत आयवळे. दत्तात्रय जाधव हे या सामाजिक कार्यात काम करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule