होलार समाजाला सत्तेमध्ये समाविष्ट करुन घेऊन चर्मकार अर्थिक विकास महामंडळामध्ये स्थान देऊन समाजाला अध्यक्ष व दोन संचालकपदी राष्ट्रवादी पक्षाकडून देण्यात यावे


जत:प्रतिनिधी
 होलार समाजाला सत्तेमध्ये समाविष्ट करुन घेऊन चर्मकार अर्थिक विकास महामंडळामध्ये स्थान देऊन समाजाला अध्यक्ष व दोन संचालकपदी राष्ट्रवादी पक्षाकडून देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय होलार समाज संघटना (ए) गटाचे आबासाहेब ऐवळे यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. 
महाराष्ट्र राज्यामध्ये होलार समाजाची लोकसंख्या पंचवीस लाख असून या होलार समाजाला स्वातंत्र्या पासुन आज अखेर कोणत्याही पक्षाने राजकीय स्थान दिले नाही. तरी हा समाज नेहमी सांगली जिल्हयामध्ये व महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पक्षासोबत कायम राहिला असुन ना. जयंत पाटील हेच व त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच होलार समाजाला न्याय देऊ शकतो. ना. पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष या नात्याने लक्ष घालून होलार समाजाला चर्मकार अर्थिक विकास महामंडळामध्ये स्थान देऊन समाजाला अध्यक्ष व दोन संचालक पदी आपल्या पक्षाकडून देण्यात यावे. होलार समाजाला स्वातंत्र्यापासुन न्याय कोणीही देऊ शकले नाहीत ते आपण देऊन समाजाला न्याय दयावा, असे निवेदनात म्हटले आहे. या मागण्याचे निवेदन देताना आबासाहेब ऐवळे, अविनाश वाघमारे कुंभारीचे सरपंच राजाराम जावीर, एन डी कांबळे, जेष्ठ नेते बाजी केंगार, राष्ट्रवादी नेते सुरेशराव शिंदे, राष्ट्रवादी युवक जत तालुकाध्यक्ष उत्तम चव्हाण, नगरसेवक स्वप्नील शिंदे उपस्थित होते.
संपादक 
शशिकांत हेगडे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule